Tag Archives: husband whips wife

मेरे रंग मे रंगनेवाली

स्वराची हाक ऐकून पूर्वा चालायची थांबली.

“वॉव..स्वरा…काय म्हणतेस ? कशी आहेस ?” स्वराचा हात हातात घेत पूर्वाने विचारले
“मी मजेत. तू कशी आहेस ? रोज येतेस का या बागेत फिरायला ?”
“हो. अग माझं घर इथे जवळच आहे ना”

“पण एकटीच ? अभिषेक नाहीत सोबत ?”

“अगं घरात जिम आहे , ते तिथेच व्यायाम करतात. पण मला सकाळी बाहेर फिरायला आवडतं. म्हणून मी येते”

“ओह..घरामध्येच जिम..बडे लोग. बडी बाते ..” स्वरा चिडवत म्हणाली.

“ए चूप ग…” पूर्वा लाजत लटक्या रागाने म्हणाली.

“चल ना पूर्वा थोडा वेळ गप्पा मारत बसूयात. रमेश ऑफिसच्या कामानिमित्त चार दिवस बाहेरगावी गेलाय म्हणून मी निवांत आहे. नाहीतर आम्हाला कुठे निवांतपणा”

दोघी बागेतील बाकावर बसल्या.

“पूर्वा मी तुझ्या लग्नाला तर आले, पण तुझं लग्न जुळलं कसं ..इतकं मोठं स्थळ कसं आलं…वगैरे काहीच माहीत नाही मला. सांग ना सगळी स्टोरी मला “

“अगं स्टोरी वगैरे काय..? तुला तर माहितीये आमची पण माहेरची परिस्थिती साधारणच आहे. आपलं ग्रॅज्युएशन झालं त्यानंतर त्यांना माझ्या लग्नाची चिंता होतीच. ते एका छोट्या फर्ममध्ये अकाउंटट होते. पगार फारसा नव्हता पण त्यांच काम खूप चोख असायचं. अभिषेकच्या फर्ममध्ये अकाउंटटची गरज होती आणि कुणीतरी त्यांना बाबांचं नाव सुचवलं. त्यानंतर बाबांनी अभिषेकची फर्म जॉईन केली. नंतर फर्मच्या एका समारंभात सगळ्या कर्मचार्‍यांना सहकुटूंब बोलावलं होतं. आम्ही पण सगळे गेलो. तेव्हा अभिषेकनी मला पाहिलं. दोन दिवसांनी त्यांनी बाबांना घरी बोलावलं. माझ्याबद्दल विचारलं. त्यानंतर आम्ही सगळेच त्यांच्या घरी गेलो. त्यांच्या घरी बघण्याचा छोटासा कार्यक्रम झाला आणि ठरलं लग्न.”

“हं..  तुला पाहून त्यांना पहिल्या नजरेतच प्रेमात पडलेत म्हणजे.तू आहेसच अशी सुंदर, ब्युटीक्वीन.. ए पण तुला कसं वाटलं त्यांना भेटून”

“बाई गं… माझा तर विश्वासच बसत नव्ह्ता. ते इतके मोठे, श्रीमंत, दिसायलाही देखणे आणि रुबाबदार. आणि त्यांनी मला अशाप्रकारे मागणी घालावी. मी तर गोंधळूनच गेले होते अगदी.”

“मग ? ते काय बोललेत ? तू काय बोललीस ?”

“मला तर काही सूचतच नव्हतं आणि ते पण जरा कमीच बोललेत. पण नंतर एकांतात बोलण्यासाठी आम्ही त्यांच्या खोलीत गेलो तेव्हा त्यांनी मला दोन गोष्टी सांगितल्या”

“काय ?”

“ते म्हणाले ‘पूर्वा मला तू बघताच क्षणी खूप आवडलीस. पण तू मात्र केवळ वडीलांच्या आग्रहाने हे लग्न करीत नाहीयेसना याची मला खात्री हवीय. तुझ्या मनात दुसरं कुणी असेल किंवा तुला मी आवडलो नसेन तर तसं स्पष्ट सांग. तुझ्या नकाराने तुझ्या बाबांना नोकरीत काही अडचण येईल अशी भिती मनात आणू नकोस. झालंच तर तुझ्या बाबांनाही मी समजवेन'”

“मग ? तु काय म्हणालीस ?”

“काय म्हणणार ? तुला तर माहित आहेच की माझं असं काही नाही. वयात आल्यापासून आई नेहमीच हे सांगत आली की प्रेम-बिम असलं काही करायचं नाही त्यात घराची बदनामी होते वगैरे. मी त्यांना म्हणाले की ‘असं काही नाहीये. मी मुलींच्या कॉलेजातूनच शिकले. आणि मलाही तुम्ही आवडलात. पण तुम्ही इतके मोठे..म्हणजे हुशार, श्रीमंत, कर्तॄत्ववान आणि मी अगदी सामान्य.'”

“मग ?”

“ते म्हणाले ‘तु खूप सुंदर आहेस, तुझा चेहरा, तुझे डोळे, तुझे केस, तुझे ओठ , तुझा गोरा वर्ण सगळं काही अतिशय सुंदर आहे. तुझा आवाज खूप गोड आहे'”

“ओह.. क्या बात.. तु तर लाजून लाल झाली असणार”

“हो नाहीतर काय. पहिल्याच भेटीत असं बोलतं का कुणी. आणि ते असं बघत होते माझ्याकडे की मला धड नजर वर करुन त्यांना बघायलाही शरम वाटत होती. थोड्या वेळाने ते म्हणाले ‘आता दुसरी गोष्ट ऐक. पती-पत्नीच्या नात्यात कुणी मोठं नसतं , कुणी लहान नसतं. हे नातं समानतेवर आधारलेलं असतं. तु ही असंच मानतेस ना ?’ त्यांच्या या प्रश्नाने मी अजूनच गोंधळून गेले. काय बोलावं काही कळेना. मी आपलं त्यांच्या हो ला हो केलं. मग ते म्हणाले ‘छान. पण आता ते विसरायचंस. कारण आपल्या नात्यात तुला नेहमीच माझं ऐकावं लागेल, माझ्या आज्ञेत रहावं लागेल. तुझे सगळे लाड मी पुरवेन, तुला कशाची कमी नसेल. पण सगळे अधिकार माझ्याकडेच असतील. आणि तु जाणतेपणानं एखादी आज्ञा मोडलीस तर मी खूप कठोर होईन. तुला हे मान्य असेल तर आणि तरच तु माझ्याशी लग्न कर.”

“मग तु काय म्हणालीस ?”

“मला तर काहीच कळेना. काही क्षणांपुर्वी रोमँटिक होवून माझ्या सौंदर्याची स्तुती करणारे अभिषेक आता हे काय बोलत आहेत. मला काहीच सुचेना काय बोलावं.  ते असं अगदी अचानकपणे आणि ठासून बोललेत ना की मी गोंधळले. मग तेच म्हणालेत की ‘दोन दिवस नीट विचार कर मग उत्तर दे. दोन दिवसानी पुन्हा इथे ये. आणि हो एकटीच ये म्हणजे तुला काही दडपण वाटणार नाही.'”

“मग तु काय विचार केलास ?”

“तसं म्हंटलं तर ते काही चुकीचं बोलत नव्हतेच. माझ्याही मनावर आतापर्यंत बिंबवलेला संस्कार हाच आहे की बायकोने नवर्‍याचं सगळं ऐकावं. बाकी घरातही मी नेहमीच आई-बाबांच ऐकत आलेले आहे, फारसा हट्टीपणा कधी केल्याचं आठवत नाही. पण माझे बाबा अजिबात कठोर नाहीत त्यामुळे घरात कुणाचं काही चुकलं तरी ते शांतपणेच समजवतात. अभिषेकने ‘मी कठोर होईन’ असं जे म्हंटलं ते थोडं वेगळं वाटलं. खरतर थोडी भितीच वाटली की लग्नानंतर आपलं कसं होईल. कधी अभिषेकना माझा कसला राग आला तर ते काय करतील, माहेरी तर पाठवून देणार नाही ना , लग्न मोडणार तर ना ? पण खरं सांगायचं तर मी पण अभिषेकच्या प्रेमात पडले होते. मग विचार केला एकदा त्यांच्या आज्ञेत रहायची सवय झाली की मग कधी आज्ञा मोडली जाणारच नाही. आणि त्यातून कधी ते संतापलेच तर घेईन ऐकून , करेन थोडं सहन. कुणाशीही लग्न केलं तरी तो व्यक्ती माझ्यावर कधी रागावणार नाही असं तर नाही ना. इथे हे आधीच स्पष्ट सांगत होते इतकंच.”

“बरं मग ? भेटल्यावर काय बोलण झालं तुमचं” स्वराची उत्सुकता वाढली होती.

“मी म्हणाले त्यांना की ‘मला तुमचं म्हणणं मान्य आहे, माझी काही हरकत नाही’ त्यावेळी आमच्या अंगणातील बगिच्यात बसलो होतो. माझं उत्तर ऐकून त्यांनी माझा हात हातात घेतला. त्यांच्या नजरेनं मी लाजून गेले. मी त्यांना म्हणाले

‘अभिषेक , मला आवडेल नेहमीच तुमच्या धाकात रहायला आणि तुमच्या आज्ञा झेलायला'”

“वॉव..मग ? काय म्हणालेत ते ?”

“ते हसलेत , त्यांनी मला जवळ घेतलं आणि म्हणालेत ‘तु खूप गोड मुलगी आहेस, अशीच रहा’…मी त्यांच्या छातीवर डोकं टेकलं तेव्हा वाटलं ‘ज्याच्या आज्ञेत रहावं असेच आहेत अभिषेक..’ ”

“मग लग्नानंतर आहेस का तु त्यांच्या आज्ञेत ?”

“हो गं.. म्हणजे काय ? प्रत्येक गोष्ट मी त्यांना विचारुनच करते. त्यांनी मला जितकं स्वातंत्र्य दिलंय त्याच्या बाहेर मी कधी जात नाही. आणि खरं सांगू त्याची कधी गरजही वाटली नाही. आता दोन महिने झालेत लग्नाला आणि मी खूप खूष आहे. त्यांनी घालून दिलेले सगळे नियम , त्यांच्या सगळ्या आज्ञा अगदी योग्य असतात, उगाच त्रासदायक असं काही नाही. मग त्यांचं पालन करायला काय हरकत आहे ना ? शिवाय ते माझी खूप काळजी घेतात , माझ्यावर त्यांचं खूप प्रेम आहे. मग मी कशाला उगाच उद्धटपणा करु ना ?”

“छान, अगं तु खूष आहेस ना, मग झालं तर. आणि तसंही तु त्यांचं सगळं ऐकायची सवय लावून घेतली आहेस तर तुला त्रास होणार नाहीच.”

दोघींच्या गप्पा चालू असताना मध्येच स्वरा म्हणाली “ए तुझा गाऊन खूप छान आहे गं. मी मगाशीच म्हणणार होते. पण राहिलंच बघ..”

तशी पूर्वा चपापली.

“स्वरा, मी निघते. मला खूप उशीर झाला. निघायला हवं , बाय” असं म्हणत पूर्वा उठून उभी राहिली.

“अगं काय झालं एकदम ? आणि तु अशी घाबरलीयस का ?” स्वराने गोंधळून विचारलं

“काही नाही. मी जाते” पूर्वा भितीने कापू लागली होती हे स्पष्टच दिसत होतं.

“पूर्वा ..अगं काय झाल ? नीट सांग पाहू.. आधी बस तू इथे” स्वराने पुर्वाचा हात धरुन तिला बसवले “पाणी पितेस का थोडं ?” स्वराने पर्समधून पाण्याची बाटली काढत विचारलं.

“नाही नको. मी जाते. सॉरी. मला जावू दे ना प्लीज” पूर्वा गोंधळून कसबसं बोलली.

“पूर्वा.. शांत हो पाहू. आणि नीट सांग काय झालं ते. तु घाबरलीयेस का ?”

“स्वरा माझ्याकडून खूप मोठी चूक झालीये गं.”

“काय झालंय पूर्वा ?”

“मी दहा-पंधरा दिवसापासून रोज सकाळी फिरायला जाते. आणि कधी कधी कपडे बदलायचा कंटाळा आला तर नाईट गाऊनवरच जाते. पण अभिषेकला ते आवडत नाही. म्हणून मागच्या आठवड्यात त्यांनी मला बजावलं होतं की ‘तु असं नाईट गाऊन वर फिरलेलं मला अजिबात आवडंत नाही. तु माझी बायको आहे आणि तुझं असं नाईट गाऊनवर फिरणं माझ्या स्टेटसला शोभत नाही. तु ट्रॅक सूट घाल, जीन्स-टीशर्ट घाल किंवा वाटलंच तर पंजाबी ड्रेस घाल पण यापुढे असं नाईट गाऊनवर घराबाहेर फिरायचं नाहीस.’ मग त्या दिवसानंतर मी रोज सकाळी ट्रॅकसूट नाहीतर पंजाबी घालूनच बाहेर पडते”

“ओह.. मग आज काय विसरलीस का कपडे बदलायचं ?”

“नाही गं कंटाळा केला मी. म्हणजे आज बाहेर फिरायला जायचा कंटाळा आला होता. मी घरच्या बगिच्यातच दहा-पंधरा मिनटं फिरुयात असा विचार केला. आणि कुंपणाची भिंत बरीच उंच असल्याने तिथे फिरताना गाऊनवर फिरलं तरी कुणी बघणार नाही म्हणून कपडे बदलले नाहीत. पण नंतर बाहेरचं वातावरण बघून बाहेर फिरण्याचा मोह झाला आणि मी विसरुनच गेले की बाहेर जायचं नव्हतं”

“हं.. चुक झाली आहे खरी. पण तु इतकी घाबरलीयेस का ? अभिषेक रागावतील थोडंफार तु ऐकुन घे आणि सॉरी म्हण. हवतर त्यांना सांग की ‘सकाळ्पासूनच डोकं दुखत होतं त्यात मी विसरुनच गेले’ म्हणजे जरा कमी रागावतील”

“नाही गं. असं खोटं नाही बोलू शकणार मी. ते रागावलेत तर त्यांच्यासमोर माझ्या तोंडून शब्द फुटणही कठीण आणि खोटं बोलणं तर अजिबातच जमणार नाही. त्यापेक्षा काही न बोलता मान खाली घालून ते जी काही शिक्षा देतील ती मी घेईन”

“शिक्षा ? अभिषेक शिक्षा करतात तुला ?”

“अजूनपर्यंत तरी नाही केली. पण ते म्हणाले होते तसं एकदा”

“काय म्हणाले होते ? कधी ?”

“आमच्या हनीमूनच्या वेळी. एकदा आम्ही कँडल लाईट डिनर करत होतो. इतक्यात माझा फोन वाजला. रश्मीचा फोन होता म्हणून मी घेतला.”

“मग ? अभिषेक रागावलेत ?”

“माझा कॉल चालू असेपर्यंत काही बोलले नाहीत. पण नंतर म्हणालेत ‘पूर्वा , काल मी तुला म्हणालो होतो की आपण हनीमूनला आलो आहोत तेव्हा तु तुझा फोन फक्त दुपारी दोन तास चालू ठेवू शकतेस, इतर वेळी बंद ठेवायचास. तुला कळालं नव्हतं का माझं बोलणं ?’ मी म्हणाले ‘तसं नाही अभिषेक, पण दुपारी रश्मीचा मेसेज आला होता. संध्याकाळी निवांत बोलते असं म्हणाली ती. ती माझी खूप जवळची मैत्रीण आहे. ती आपल्या लग्नाला येवू शकली नव्हती. म्हणून तिला माझ्याशी आता बोलायचं होतं आणि मी जर फोन बंद ठेवला असता तर तिला वाटलं असतं की मी तिच्यावर नाराज आहे’. पण अभिषेकचा राग कमी झाला नाही, ते म्हणाले ‘ओह.. म्हणजे तु विसरली नव्हतीस उलट जाणतेपणी तु माझी आज्ञा मोडलीस तर. मला काही तुला तुझ्या मैत्रीणीपासून तोडायचं नाहीये. पण रश्मीचा कॉल येणार आहे असं सांगून तु माझ्याकडे फोन चालू ठेवायची परवानगी मागू शकली असतीस’ मला त्यांचा राग कळत होता. मी चुकले होतेच. मी त्यांचा हात हातात घेवून म्हणाले ‘अभिषेक, मी चुकले. प्लीज मला माफ करा. तुमची आज्ञा मोडायची असं काही माझ्या मनात नव्हतं पण माझ्याकडून चुकून तसं झालं. मी आताच फोन बंद करुन तुमच्याकडे देते आणि हनीमूननंतर घरी परतल्यावरच मला तुम्ही तो परत करा. पण प्लीज आता रागवू नका ना’.त्यावर थोडं शांत होत ते म्हणालेत ‘ठीक आहे. ही तुझी पहिलीच चूक आहे आणी आपण हनीमूनसाठी आलो आहोत. त्यामुळे मी तुला शिक्षा देत नाही. पण लक्षात ठेव यापुढे जर तु माझ्या आज्ञेचं पालन केलं नाहीस तर….” ‘शिक्षा’ हा शब्द ऐकून माझ्या चेहर्‍याचा रंग उडालेला पाहून ते म्हणाले ‘शिक्षा हा शब्द ऐकूनच तु घाबरलेली दिसतेयस. पण घाबरु नकोस. जर तु कधीच माझ्या शब्दाबाहेर गेली नाहीस तर हा शब्दही तुला कधी ऐकावा लागणार नाही.”

“ओह…” स्वरा विचारात पडली.

“स्वरा, काय शिक्षा करतील गं मला. माझे तर हातपायच गळून गेलेत भितीने”

“हे बघ पूर्वा तु घाबरु नकोस. आता चूक केली आहेस तर तुझ्यासमोर शिक्षेला सामोर जाण्याशिवाय काही पर्याय नाहीच. पण ..अभिषेक तुला काय शिक्षा देतील ते नाही सांगता येणार”

“मारतील का गं ते मला ? की माहेरी पाठवून देतील ?”

“माहेरी पाठवतील असं तर नाही वाटत मला. मारण्यबद्दल काही सांगता येत नाही. …इतके श्रीमंत लोक मारत असतील का बायकांना ? ”

“तुला कधी पडलाय मार रमेशकडून”

“अगं आताच्या काळातला मुलगा, तो पण मध्यमवर्गीय… बायकोला मारायची हिंमत लवकर होत नाही या मुलांची. आमच्या लग्नाला तीन वर्षे झालीत आणि ते ही प्रेमविवाह ..तरी रमेशने आता कुठे सहा महिन्यापुर्वी पहिल्यांदा हिंमत करुन मला एक कानाखाली लावली. बरं थप्पड मारुन नंतर साहेब स्वतःच टेन्शनमध्ये. पुढचे दोन-तीन दिवस मला रोज सॉरी काय म्हणत होता, फिरायला काय नेत होता. मला तर हसूच येत होतं. मग मी फार काही त्रागा केला नाही, माहेरी कुणाला काही सांगितलं नाही हे बघून त्याचा आत्मविश्वास हळूहळू वाढला. आता अलिकडे आमचा जास्त वाद झाला, किंवा तो माझ्यावर चिडला की तीन-चार कानाखाली वाजवतो तो”

“बाप रे.. कसं काय सहन करतेस तु ? लागत असेल ना पुरुषाचा हात खूप ? आणि तुला राग नाही येत ?”

“हो.. रमेशचा हात खूप लागतो. तीन-चार सणसणीत कानाखाली पडल्यात की कानशिलं तापतात. डोळ्यांतून पाणी येतं. अगं पण त्यातही एक थ्रिल असतं गं. तो जेव्हा मारण्याकरिता हात उचलतो ना तेव्हा माझ्या छातीची धडधड वाढते. त्या वेदनेची भिती असते पण तरीही एक उत्सुकताही असते. त्याने हात उगारल्यावर तो गालावर पडेपर्यंत माझं मन आतुरतेनं प्रतीक्षा करत असतं. मागे एक दोनदा असं झालं की त्याने हात उगारला पण नंतर स्वतःला आवरलं. तेव्हा मला फार अस्वस्थ वाटलं. त्यामुळे आता त्याने हात उगारला की भिती वाटते ती त्याच्या थप्पडची नसते तर तो पुन्हा स्वतःला आवरणार तर नाही ना याची असते. वाटतं त्याने असंच बरसत रहावं थप्पड देत रहावं. आणि थप्पडच का माझ्या सर्वांगावर फटके देत रहावं. मी तर त्याला अजून स्फुरण चढेल असंच वागते. आमचं भांडण झालं आणि तो माझ्यावर चिडला की मी त्याला अजून चिथावणी देते आणि म्हणते ‘नुसता ओरडतोयस कशाला, मार, फटके दे, नाहीतरी आता सवय झाली आहे मला. मी तर काही करु शकत नाही तुला माहितच आहे. वाजव कानाखाली नाहितर काठी घेऊन बडव मनसोक्त. त्याकरिता तर आणलं आहेस ना मला ?’ मी असं चिडून बोलले की तो अजून चिडतो मला सटासट कानाखाली वाजवतो. त्याचं मारुन झालं की मी खूप नरम होते, त्याचे पाय धरते, त्याची माफी मागत रहाते. एरवी कधी कधी प्रेमाच्या भरात तो मला विचारतो ‘स्वरा , आजकाल मी तुझ्यावर हात उचलू लागलोय. तुला राग येत असेल ना माझा ? सॉरी पण तू कधी कधी अशी वेड्यासारखी वागतेस, चिडचिड करतेस मग मलाही राग अनावर होतो. पण खरंच माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मला तु खूप आवडतेस’. मग मी म्हणते ‘नाही रमेश, तु प्लीज माफी नको मागूस. मला माहितीये की मीच खूप हट्टीपणा करते आणि माझ्या अशा स्वभावामुळे मला शिक्षा मिळते. माझ्या हट्टीपणामुळे तु मला कधी दूर लोटू नकोस इतकंच माझं मागणं आहे बाकी तुझ्या हातचा मार खाण्याबद्दल माझी काहीच तक्रार नाही रे. पण कुणासमोर कधी हात उचलू नकोस माझ्यावर, एकांतात हवं तितकं मार. पण माझ्यावर प्रेम करत रहा’

आणि खरं सांगु पूर्वा तो माझ्यावर हात उचलू लागला तेव्हापासून आमचं नातं अधिकच घट्ट होवू लागलंय. त्या आधी दोन-अडीच वर्षांचा संसार झाल्यावर कधी चिडचिड होवू लागली होती, कधी एकमेकांच्या सहवसाचा कंटाळा येवू लागला होता. पण आता हे नातं पुन्हा नवीन, छान, हवंहवंसं वाटू लागलंय. मार लागतो, नक्कीच लागतो.. पण तरी मनात विश्वास असतो की मला झेपेल इतकीच शिक्षा तो देईल. उद्या कदाचित त्याने काठी, छडी वा आणि कशाने मला फटके दिलेत तर खूप वेदना होतील, माझ्या शरीरावर काही वळ उमटतील आणि काही दिवसांनी वळ नाहीसे होतील, वेदनाही रहाणार नाही पण माझ्या शरीरावरचे ते वळ बघताना तो नक्कीच भावूक होईल, माझ्या प्रेमावरचा त्याचा विश्वास अजूनच वाढेल. त्याच्या माझ्यावरील अधिकाराचा पुरेपुर वापर करुन तो मला मार देईल पण त्याच वेळी त्याच्या जबाबदारीची जाणीवससुद्धा त्याला नव्याने होईल. ही स्त्री माझ्यावर इतकं प्रेम करते, मी तिला दिलेली शिक्षासुद्धा विश्वासाने स्वीकारते, तिच्या आनंदाची, सुखाची जबाबदारी माझी आहे ही ती जाणिव. तुझ्या लग्नाला फक्त दोन महिने झाले आहेत त्यामुळे तुझी मानसिक तयारी नसेल कदाचित. तरीही मी तुला हेच म्हणेन की जरी अभिषेकनी  तुझ्यावर हात उचलला तरी त्यांच्याबद्दल मनात राग धरु नकोस. ते तुला जी काही शिक्षा देतील त्यात त्यांचं प्रेमच असेल. त्यामुळे तु त्रागा करु नकोस”

“स्वरा ,मला पटतंय तुझं म्हणणं. त्यांनी मला मारलं तरी मला त्यांचा राग नाही येणार हे नक्की. आणि मी चुकले आहे हे तर खरंच त्यामुळे शिक्षा तर स्वीकारायलाच हवी. पण ते मला किती मारतील , मला मार सहन करता येईल का याचीच भिती वाटते गं”

“अगं घाबरु नकोस. तुझा त्यांच्यावर पुर्ण विश्वास आहे ना ? मग मिळालेली शिक्षा प्रेमाने आणि धैर्याने स्वीकार. बरं तु जास्त टेन्शनमध्ये आहेस , तर नीट घरी जाशील ना ? की मी येवू सोडायला ?”

“नको. मी जाते एकटी. तुला सोबत घेवून गेले तर मी शिक्षेपासून वाचण्याकरिता मुद्दाम मैत्रिणीला सोबत घेवून आले असं कदाचित त्यांना वाटू शकतं”

“ठीक आहे. बाय. ऑल द बेस्ट” पूर्वाला जवळ घेत स्वरा म्हणाली.

 

पूर्वा घरी आली. अभिषेक बाहेर पेपर वाचत बसला होता.

“गुड मॉर्निंग पूर्वा” अभिषेक तिच्याकडे पाहून हसत म्हणाला.

“गुड मॉर्निंग अभिषेक” किंचित थांबून पूर्वा म्हणाली. तिच्या छातीचे ठोके वाढले होते, हातापायांना कंप सुटला होता. “अभिषेक..मी चुकले. मी आज तुमचं ऐकलं नाही. मी गाऊन बदलण्याचा कंटाळा केला. आय अ‍ॅम रियली सॉरी अभिषेक. प्लीज मला माफ करा” पूर्वा अभिषेकसमोर गुडघे टेकून आणि मान खाली घालून उभी होती.

“पूर्वा … जा लवकर. आंघोळ करुन ये. मी नाष्ट्यासाठी तुझी वाट बघतोय. मला ऑफिसला जायचंय आता. तु ये लवकर”

“हो…” पूर्वा मान खाली घालून निघून गेली.

नाश्ता करतानाही अभिषेक जणू काही झालंच नाही असं वागत होता तर पूर्वाची तगमग वाढत होती.

अभिषेक ऑफिसला निघाला तेव्हा पूर्वाने त्याचा हात धरुन त्याला थांबवलं

“अभिषेक, खरंच सांगा ना तुम्ही रागावलाय ना माझ्यावर. प्लीज तुम्ही बोला ना काहीतरी. रागवा माझ्यावर. मला माहितीये मी चुकलीयं , मी तुमची आज्ञा पाळली नाही.” बोलता बोलता पूर्वा रडू लागली.

“पूर्वा… चल मी आता ऑफिसला जातोय. मला उशीरा जावून चालणार नाही. आपण बोलू संध्याकाळी. बाय”

अभिषेक निघून गेला. पूर्वाच्या जीवाची तगमग वाढत होती.

न राहवून पुर्वाने स्वराला फोन लावला.

“काय झालं पूर्वा ? काय म्हणालेत अभिषेक ?”

“अगं ते काहीच बोलले नाहीत, म्हणजे माझ्या चुकीबद्दल त्यांनी नाराजी किंवा राग काहीच व्यक्त केलं नाही”

“ठीक आहे ना मग तू उगाचचं घाबरत होतीस” स्वरा हसत म्हणाली.

“नाही गं. आता तर माझं टेन्शन अजूनच वाढलंय. संध्याकाळी घरी आल्यावर ते मला माहेरी पाठवून देतील की काय अशी भिती वाटू लागलीय. मला त्यांनी फटके लगावलेत तर चालतील गं पण अशी शिक्षा नको द्यायला इतकीच इच्छा आहे.”

“हं…” स्वरा विचारात पडली

“स्वरा.. टेन्शनने माझा जीव चाललाय गं. काय करु मी”

“पूर्वा, हे टेन्शनपण तुझ्या शिक्षेचाच एक भाग आहे असं समज आणि शांतपणे वाट बघ”

पुर्वाने तो विषय कसाबसा डोक्यातून काढण्याचा प्रयत्न केला आणि ती स्वयंपाकाकडे वळली. घरी सगळ्या कामाला नोकर आणि चांगले आचारी असले तरी “स्वयंपाक मात्र मलाच करु द्या” असा हट्ट पूर्वाने केला आणि अभिषेकने तो मान्य केला होता. फक्त कधी तिला कंटाळा आला तर आचारी जेवण बनवत असे.

पूर्वाने अभिषेकच्या आवडीचे जेवण बनविले. अगदी तल्लीन होवून एकेक पदार्थ बनवत असताना ती सगळं टेन्शन काही वेळाकरिता विसरुन गेली. काही वेळाने अभिषेकचा ड्रायव्हर येवून जेवणाचे डबे घेवून गेला.

जेवणानंतर अभिषेकने नेहमीप्रमाणेच तिच्या जेवणाची तारीफ करणारा मेसेज तिला पाठवला. त्याचा मेसेज पाहून तिला बरं वाटलं आणि ती ही शांत चित्ताने जेवली.

संध्याकाळी अभिषेकच्या येण्याची वेळ झाली तशी पुन्हा तिच्या मनात चलबिचल होवू लागली. अखेर तिची प्रतिक्षा संपली. अभिषेक घरी आला. नेहमीप्रमाणेच त्याची लॅपटॉपची बॅग , डबे ड्रायव्हरच्या हातात होते पण अभिषेकच्या हातात गिफ्ट रॅप केलेले दोन पॅकेट्स होते.

“पूर्वा, आजचा स्वयंपाक तु काकांवर सोपव, आज आपण एक खास सेलिब्रेशन करणार आहोत. मी फ्रेश होवून येतो मग आपण टेरेसवर जावूयात”

पुर्वा अजूनच चक्रावून गेली. अभिषेकने काय गिफ्टस आणलेत आणि कसलं सेलिब्रेशन तिला काही कळेना. पण आता भितीची जागा कुतुहलाने घेतली होती.

फ्रेश झाल्यावर अभिषेकने पुर्वाने त्याला भेट दिलेला शर्ट घातला. दोघे टेरेसवर आले. त्याच्या हातात ते दोन पॅकेट्स होते.

 

गच्चीत आल्यावर पूर्वाच्या मनात आठवणी जाग्या झाल्यात.

पूर्वा अभिषेकला दुसर्‍यांदा भेटायला आली आणि तिने अभिषेकने घातलेली अट मान्य असल्याचे त्याला सांगितले तेव्हा अभिषेक खूप आनंदात होता.

“पूर्वा आज डिनरसाठी इथे थांबतेस का ? आपण सेलिब्रेट करु” तिचा हात हातात घेत अभिषेकनं विचारलं

“इश्श्य ..आता मी तुमच्या शब्दाबाहेर नाही हे ठरलंच आहे ना मग विचारताय काय ?” पूर्वा लाजत उत्तरली.

“हो.. तुला माझ्या आज्ञेत रहायचं आहेच..पण ते लग्नानंतर. सध्या तुला तुझ्या आईबाबांचं ऐकावं लागेल ना तेव्हा तु त्यांना फोन करुन त्यांची परवानगी घे”

अभिषेक पूर्वाला घेवून गच्चीत आला. पहिल्या भेटीत पूर्वाने त्याचं श्रीमंती थाटाचं आणि अद्ययावत घर पाहिलं होतंच पण गच्ची ती पहिल्यांदाच बघत होती.

प्रशस्त अशा गच्चीच्या एका कोपर्‍यात एक लहान बेडरुम होती. बेडरुमपासून काही अंतरावर बाहेर चार छोटे डायनिंग टेबल्स होते, शेजारीच एक छोटा बार होता. त्याच्या बाजूला एक सर्विस टेबल, जवळच असलेला इंटरकॉम, इंटरकॉमवरुन किचनमध्ये फोन करुन जेवण मागवणं ह्या सगळ्याचं तिला अप्रुप वाटलंच. पण हे कमी की काय म्हणून अभिषेक तिला गच्चीच्या मधोमध घेवून गेला आणि तिथला प्रोजेक्टर, मोठी स्क्रीन, कॅमेरे , म्युजिक सिस्टिम हे बघून ती हरखूनच गेली.

“बाप रे.. गच्चीवरती इतकी सगळी व्यवस्था”

“हो. मला या गच्चीत पार्टी करायला आवडतं. कधी कधी माझे अगदी जवळचे मित्र , कधी एकेकटे तर कधी सहकुटूंब इथे येतात , आम्ही पार्टी करतो. इथे पूर्ण प्रायवसी आहे, बाहेरुन कुणाला काही दिसणार नाही किंवा आवाजही जाणार नाही याची व्यवस्था मी केली आहे. ”

“खूप मस्त आहे”

“पूर्वा.. डान्स करुयात ?”

पूर्वाने लाजून हसत होकार दिला.

“मग तुझ्या आवडीचं एखादं गाणं सांग बरं..”

“अं… ” क्षणभर विचार करत पूर्वा आजूबाजूला बघत उत्तरली “…मला ‘मेरे रंग मे गाणं’ आठवतंय आता तुमची ही सुंदर टेरेस बघून”

“पण छान चॉईस आहे. मलाही ते गाणं आवडतं…पण एक चुकलीस तू पूर्वा” गंभीर होत अभिषेक म्हणाला

“क.. का.. काय झाल ?” पूर्वा अडखळत म्हणाली.

“तुमची टेरेस नाही आपली टेरेस म्हणायला हवं होतंस”

“ओह… पण ते लग्नानंतर ना ?.. आणि तुम्ही तरी कुठे मला अजून ‘आपली’ म्हणालात?”  पूर्वा मिष्किलपणे हसत म्हणाली.

“हे घे.. आता म्हणतो.” पूर्वाला जवळ ओढत अभिषेकने तिला मिठीत घेतले. तिच्या ओठांवर ओठ टेकवत तो म्हणाला ” पूर्वा.. तु मला खूप आवडतेस. आय लव्ह यू ”

“अभिषेक. तुम्ही खूप छान आहात. माझंही तुमच्यावर खूप प्रेम आहे”

अभिषेकने म्युजिक सिस्टीम, कॅमेरे आणि प्रोजेक्टर चालू केलेत.

“हे काय ?” स्क्रीनवर स्वतःला पाहून पूर्वा हसू लागली “आपण डान्स करायचा आणि आपणच आपल्याला स्क्रीनवरपण पहायचं का ?”

“हो.. खूप मजा वाटेल बघ. आणि व्हिडिओ रेकॉर्ड पण होईल. चालेल ना तुला ?”

“अभिषेक.. तुम्ही अधिकार पण सांगता आणि चालेल का म्हणून पण विचारता. आम्ही नाही जा” लटक्या रागाने पूर्वा म्हणाली. तिची ती निरागसता पाहून अभिषेकला हसू आवरलं नाही.

गाणं वाजू लागलं. दोघांची पावलं थिरकू लागली. दोघांना एकेमकांचा स्पर्श खूप मोहवत होता. क्षणाक्षणाला दोघे खूप उत्तेजित होत होते. तिच्या देहावरुन फिरणारी त्याची नजर तिला सुखावत होती.

 

“पूर्वा ..” अभिषेकचा आवाज ऐकून पूर्वा आठवणींतून जागी झाली.

“हे काय अभिषेक ?” अभिषेकने एक पॅकेट उघडले होते त्यात एक ड्रेस होता.

“तुझ्याकरिता गिफ्ट”

“पण आज ? काय विशेष ?”

“हो. विशेष आहे. आज आपण सेलिब्रेट करणार आहोत.”

“काय सेलिब्रेट करणार आहोत ?”

“नंतर सांगेन. तु आधी हा ड्रेस घालून ये”

“ओके” पूर्वा ड्रेस घेवून बेडरुममध्ये गेली.

इकडे अभिषेकने ड्रिंक बनवलं आणि काही खाण्याकरिता मागवलं.

पूर्वा कपडे बदलून आली. त्या लाल रंगाच्या झुळझुळीत ड्रेस मध्ये ती अजूनच सुंदर आणि मादक दिसत होती. तिच्या सौंदर्याचं कौतूक अभिषेकच्या डोळ्यांत मावत नव्हतं

“अभिषेक , प्लीज आता तरी सांगा ना कसलं सेलिब्रेशन ते” पूर्वाने काहीसं लाजत विचारलं.

“चलं आधी काही खावूयात , ड्रिंक घेवूयात”

पूर्वा दारु पित नसे म्हणून तिच्या आवडीचं कोल्ड ड्रिंक अभिषेकने तिच्या ग्लासमध्ये ओतलं.

ड्रिंक आणि खाणं झाल्यावर पूर्वाचा हात धरुन अभिषेकनी तिला पुन्हा दुसर्‍या टेबलापाशी नेलं

अभिषेकनी आता दुसरं पॅकेट उघडलं , ते उघडत असताना पूर्वाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.

आतील बॉक्समध्ये एक गडद तपकीरी रंगाचा चाबूक होता. असा चाबूक पुर्वाने आजपर्यंत केवळ सिनेमांत पाहिला होता.

“पूर्वा आज आपण तुझी शिक्षा सेलिब्रेट करणार आहोत. माझ्या आयुष्यात आणि या घरात आल्यावर तुला मिळणारी पहिली शिक्षा आहे. ही तुला कायम लक्षात रहावी असं मला वाटतं”

अभिषेकने पूर्वाचा हात हातात धरला. तिचा हात थंड पडला होता तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता.

अभिषेक तिच्यापाठीमागे गेला. त्या ड्रेसमधून तिच्या पाठीचा बराचसा भाग उघडा होता. तिच्या सुंदर आणि गोर्‍या पाठीवरुन तो अलगद त्याची बोटं फिरवू लागला. ती शहारली. तिने मान खाली घातली.

“पूर्वा आज तु माझी आज्ञा मोडलीस , त्याकरिता मी तुला शि़क्षा देणार आहे. तुला तुझ्या वागण्याचा पश्चाताप झालाय हे देखील मला माहित आहे. पण तरीही तुला शि़क्षा मिळणारच. आणि ही तुझी पहिलीच वेळ असली तरी मी कठोरपणे शि़क्षा देणार आहे. या चाबकाने मी तुझ्या शरीरावर अनेक फटके देईन” तिच्या पाठीवर बोटं फिरवत तो म्हणाला.

त्यानंतर काही क्षण शांततेत गेलेत.

“पूर्वा ” अभिषेकने तिला हलकेच आपल्याकडे वळवले. तिच्या हनुवटीला बोट लावून तिचा चेहरा त्याने उचलला.

झुकलेली नजर हलकेच वर उचलीत पूर्वाने अभिषेककडे पाहिले.

“अभिषेक ” तिच्या नजरेत वेदना, प्रेम आणि व्याकूळता या भावनांचं मिश्रण होतं

“मी शि़क्षा स्वीकारण्यासाठी तयार आहे अभिषेक. माझा तुमच्यावर पुर्ण विश्वास आहे.” त्याच्या डोळ्यात पहात ती म्हणाली.

“दॅट्स गुड पूर्वा” पूर्वाने कोणताही त्रागा, विनवण्या , आर्जव केली नाहीत हे बघून अभिषेक थोडा आचंबित झाला होता. चाबूक उचलत तो म्हणाला “मग सुरु करुयात ?”

“चालेल अभिषेक. पण सेलिब्रेशन आधी करुयात का प्लीज ?”

तिच्या प्रश्नाने अभिषेक गोंधळला.

“डान्स शिवाय सेलिब्रेशन कस ना ? पण शिक्षा मिळाल्यावर मी कदाचित डान्स करु शकणार नाही. म्हणून आता करुयात का प्लीज ?”

“डान्स ? ओके.. चालेल. कोणतं गाणं लावू ?” अभिषेक आश्चर्य लपवत म्हणाला.

“तेच.. आपल्या दोघांच्या आवडीचं. मेरे रंग मे रंगनेवाली. आज मी तुमच्या प्रेमाच्या एका वेगळ्या रंगात रंगणार आहे.” त्याचा हात हातात घेत ती म्हणाली.

“अभिषेक , कॅमेराज आणि प्रोजेक्टर पण चालू कराल प्लीज ? मला या वेदनेचा, या शिक्षेचा पुर्ण अनुभव मनात साठवायचा आहे. तुम्ही माझ्या पाठीवर फटके द्याल तेव्हा मी तुम्हाला पाहू शकणार नाही. पण तुमचं ते रुप मला या स्क्रीनवर बघायला मिळेल. चाबकाचे वळ पुसले जातील पण तुमच्या प्रेमाचा अधिकाराचा हा आगळावेगळा आणि पहिलाच अनुभव ..याचा व्हिडिओ पण तुम्ही मला द्याल  ?”

अभिषेकने पुर्वाला जवळ ओढले.

“पूर्वा” त्याच्या डोळ्यात तिच्याबद्दलचं कौतूक दाटलं होतं

गाणं वाजू लागलं. दोघांचे पाय थिरकू लागलेत. पण तिच्या हालचालीत आज एक वेगळीच उत्स्फुर्तता होती. डोळ्यातली वेदना आणि व्याकूळता काळजाला भिडणारी होती.

गाणं संपलं. वगाने थिरकणारे तिचे पाय थांबलेत. ती भानावर आली. शिक्षेला सामोर्‍या जाणार्‍या गुन्हेगाराप्रमाणेच तिने मान खाली घातली आणि ती वाट पाहू लागली.

“पूर्वा. तुला पाणी हवयं थोडं ?”

तिनं मानेनंच नकार दिला.

अभिषेकने तिच्या पाठीवरुन रुळणारे तिचे लांब सुंदर केस खांद्यावरुन पुढे सोडलेत.

चाबूक हातात घेवून तो तिच्या पाठीमागे थोड्या अंतरावर उभा राहिला.

मान काहीशी उंचावून पूर्वा उत्सुकतेने स्क्रीनकडे पाहू लागली. स्क्रीनवर तिला अभिषेक दिसत होता. अभिषेकने चाबूक एक-दोनदा हलकेच हवेत फिरवला आणि मग पुन्हा एकदा अतिशय वेगाने चाबूक फिरवत पूर्वाच्या पाठीवर फटका लगावला.

“आ…” पूर्वा किंचित ओरडली पण पुढच्याच क्षणी तिने ओठ घट्ट मिटले. वेदना असह्य होवून तिने डोळे मिटले. ‘इतकी वेदना..नाही असा मार सहन करणं शक्य नाही. त्यापेक्षा पळून जावू इथून’ असा विचार क्षणभर तिच्या मनात चमकून गेला. पण पुढच्याच क्षणाला तिने तो दूर सारला. तिने आवंढा गिळला आणि मान खाली घातली. तिच्या पाठीची आग होत होती. तिचं अंग वेदनेनं कापू लागलं होतं. काही क्षण तसेच गेलेत. अभिषेकनं तिला सावरायलाच हा वेळ दिला होता. वेदनेचा महापूर किंचित ओसरला होता. तिनं स्वतःला सावरलं. आणि पुन्हा एकदा डोळे उघडून आणी मान काहीशी उंचावून ती स्क्रीनकडे बघू लागली. जणू आपण पुढच्या फटक्याकरिता तयार आहोत असं तिनं अभिषेकला सुचवलं.

अभिषेकने पुन्हा एकदा हवेत चाबूक फिरवला. स्क्रीनवर दिसणारं अभिषेकचं हे अनोखं रुप पुर्वा डोळे भरुन पहात होती. प्रत्येक फटक्यानंतर अभिषेक तिला सावरण्यास काही क्षणांचा अवधी देत होता. एक एक करत पूर्वाच्या पाठीवर त्याने दहा फटके दिलेत. तिच्या सुंदर गोर्‍या पाठीवर काही लाल गुलाबी वळ दिसू लागले होते.

अभिषेक काही वेळ थांबला. वेदनेतून सावरत पूर्वा स्क्रीनकडे बघत होती. अभिषेकने रिमोटने प्रोजेक्टर ऑपरेट केला. आता स्क्रीनवर त्याच्या ऐवजी तिची पाठ दिसत होती.

पूर्वा स्क्रीनवर स्वतःच्या पाठीवरचे वळ पाहू लागली. तिच्या जवळ जावून अभिषेक तिच्या पाठीवरुन हलकेच आपली बोटं फिरवू लागला. ती शहारली.

“पूर्वा तु ठीक आहेस ना ?” अभिषेकने मृदू आवाजात विचारले.

पूर्वाने मानेनंच होकार दिला.

“अभिषेक …खूप छान आहेत हे वळ”

काही क्षण स्तब्ध गेलेत.

“अभिषेक माझी शिक्षा अजून संपलेली नाहीये ना ? मग प्लीज आता थांबू नका ना”

“पूर्वा मी तुला दहा फटके दिलेत. आणि आता अजून दहा फटके देणार आहे. पण ते वेगाने येतील. तुला सावरायला अजिबात वेळ न देता”

पूर्वाने मान हलवली.

अभिषेक पुन्हा पूर्वाच्या पाठीमागे काही अंतरावर थांबला. हवेत चाबूक फिरवून आता त्याने पूर्वाच्या पाठीवर एका पाठोपाठ एक वेगाने फटके द्यायला सुरु केलं. सपासप फटके पडत होते आणि पूर्वा ते डोळे मिटून झेलत होती. तिच्या पाठीला होणारा चाबकाचा प्रत्येक स्पर्श , अपरिमित वेदनेचा तो प्रत्येक क्षण जणू ती मनात साठवायचा प्रयत्न करत होती. काही क्षणांतच अभिषेक दहा फटके मारुन थांबला. त्याने चाबूक बाजूला ठेवला.

पूर्वाचं अंग कापत होतं, डोळ्यातून अश्रू ओघळत होते. पण घट्ट मनाने ती हुंदके आवरत होती. तिच्या हाताला धरुन अभिषेक तिला बेडरुममध्ये घेवून गेला. तिच्या पाठीवर त्याने हलकेच आपले ओठ टेकवले. तिचे अंग शहारले.

त्याने तिला स्वतःकडे वळवत तिचा चेहरा हातात घेतला.

“पूर्वा तु खूप धैर्याने तुझी शिक्षा पूर्ण केलीस. तुझं माझ्यावरचं प्रेम, माझ्यावरचा विश्वास आणि तुझं हे समर्पण याने मी खूप थक्क झालोय. माझ्या मनात तुझ्याबद्दलचं कौतुक अजूनच वाढलंय.”

“थँक्स अभिषेक. या शिक्षेबद्दल खरचं मनापासून मी तुमची आभारी आहे. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. आणि तुम्ही दिलेली ही शिक्षा, चाबकाचे फटके आणि त्याची वेदना यात एक अनोखी हुरहुर आहे, वेगळी गोडी आहे. तुमच्या प्रेमाचं हे वेगळं रुप खूप सुंदर आहे”

थोड्याच वेळात दोघे प्रणयात रमले. पाठीचा दाह होत होता, वेदना होत होती तरी पूर्वाच्या प्रणयात नवी उर्जा होती.

 

“पार्क मध्ये फिरायला येत आहे. तु पण ये. भेटूयात” स्वराला सकाळी पुर्वाचा एसएमएस मिळाला. तशी ती घाईने तयार होवून पार्क मध्ये आली.

“पूर्वा… काय म्हणतेस ?” ट्रॅक सूट घातलेल्या पूर्वाकडे बघत स्वराने विचारले.

पूर्वा काहीच बोलली नाही पण हसू लागली.

“ओह हो… खूप खुषीत दिसत आहेस. काय झालं सांग तरी”

“तुझा विश्वास बसणार नाही स्वरा. चाबकाचे फटके मिळालेत मला काल रात्री. पाठीवर इतके सुंदर वळ उमटले आहेत. काय सांगू तुला” किंचित लाजत पूर्वा म्हणाली.

“वॉव…काय सांगतेस काय ?ग्रेट… मस्तच गं. कालच्या चुकीची शि़क्षा ना ? ए पण तु घाबरली तर नाहीस ना ?”

“अगं चाबूक पहिल्यांदा बघितला तेव्हा पोटात गोळा आला होता. पण तु सकाळी इतका धीर दिला होता ना. आणि अभिषेकवर माझा पुर्ण विश्वास आहे. त्या विश्वासानेच मला बळ दिलं. मग सगळी भिती दूर सारली. आणि त्या फटक्यांत वेदना होती तरी ते सगळं खूप रोमांचक होतं गं. पुन्हा पुन्हा तो प्रसंग डोळ्यासमोर उभा रहातो आणि शरीर मोहरुन जातंय. ” स्वराचा हात हातात घेत पूर्वा म्हणाली.

“ए मी येते तुझ्या घरी थोड्या वेळाने. मला दाखव ना तुझ्या पाठीवरचे वळ..” स्वरा उत्सुकतेने म्हणाली.

“स्वरा. तु नक्की ये माझ्याकडे. पण तुला मी पाठीवरचे वळ नाही दाखवू शकणार. त्यांच्यावर फक्त अभिषेकचा अधिकार आहे. सॉरी गं.”

“हं.. ठीक आहे गं. मी समजू शकते. पण मला आता तुझा हेवा वाटतोय गं” डोळे मिचकावत स्वरा म्हणाली.

[समाप्त]

प्रिय वाचक,
कृपया खालीलपैकी योग्य ती प्रश्नावली म्हणजेच सर्वे (survey)उघडून प्रश्नांची उत्तरे द्या.
घन्यवाद.

स्त्री-वाचकांकरिता-प्रश्नावली

पुरुष-वाचकांकरिता-प्रश्नावली

[अभिप्रायाकरिता संपर्क – samarpan.ek.premkatha@gmail.com]

Advertisements