Tag Archives: cruel girl

सायबर कॅफेत एक दिवस

सायबर कॅफेत एक दिवस

विषय : पीडन (स्त्रीकडून स्त्रीचे पीडन) म्हणजेच Female to Female Domination

पात्र परिचय

शेखर – सायबर कॅफे चा मालक
रश्मी – शेखरची पत्नी
नेहा  – शेखरची सहायक

“रश्मी, अगं आई आजारी आहे आणि तिला हॉस्पिटल मध्ये अ‍ॅडमिट केलंय. मला गावाला जावं लागेल. तू मात्र ईथेच थांब. आणि सात-आठ दिवस तुला कॅफे सांभाळावा लागेल” शेखर च्या मनावरचा ताण आवाजात  जाणवत होता.

“पण मी कॅफे कसा संभाळणार ?मला तर काहीच माहित नाही …”

“रश्मी, तुला शिकावं लागेल. मी उद्या निघेन, आजचा दिवस तुला सगळं काही शिकवेन. संध्याकाळी तर नेहा असते आणि ती नीट सांभाळते कॅफे पण सकाळी तुला एकटीलाच बघावं लागेल. कॅफे हे माझ्या कमाईचं एकमेव साधन आहे आणि त्यामुळे तो बंद ठेवणं मला परवडणार नाही”

शेखर २८ वर्षांचा होतकरु तरुण. कॉम्पुटरचा डिप्लोमा केल्यावर काही काळाने “खूप काम आणि कमी पैसा” असं समीकरण असलेल्या नोकरीला रामराम ठोकत त्याने स्वतःचा सायबर कॅफे चालू केला. शेखर चा सायबर कॅफे विशेष लोकप्रिय होता. अद्ययावत कॉम्प्युटर्स, ईंटरनेटचे चांगले कनेक्शन, उत्तम आसनव्यवस्था, कॉम्प्युटर गेम्स साठी विशेष सुविधा, प्रिंटींग व स्कॅनिंगच्या सुविधा तसेच अल्प दर यामुळे जास्तीत जास्त लोक याच कॅफेकडे वळायचे. सकाळी पाच तास आणि सायंकाळि पाच तास असा दहा तास कॅफे चालू असायचा. त्यापैकी संध्याकाळि जास्त गर्दी असल्याने शेखर ने यावेळेकरीता नेहा नावाच्या तरुणीस सहायक म्हणून ठेवले होते.

नेहा हुषार आणि तरतरीत होती. सहा महिन्यांपासून ती कॅफेत कामाला होती. तिथे रुजू झाल्यावर चार पाच दिवसातच ती सगळं काम शिकली. मेहनती नेहाचं वागणं मात्र शेखर ला कधी कधी आवडत नसे. ती लगट करायचा प्रयत्न करते असं त्याला वाटे. ती वयाने बरीच लहान म्हणजे २०-२१ वर्षांंची होती. त्यामुळे तिच्या थोड्याश्या विचित्र वागण्याकडे “तिच्या वयाचा परिणाम” असा विचार करत शेखर दुर्लक्ष करत असे. शिवाय दुसरा कुणी चांगला सहायक मिळणे ही सोपे नव्हतेच.

तीन महिन्यांपुर्वी शेखर चे रश्मीशी लग्न झाले होते. २५ वर्षांची रश्मी पदवीधर असली तरी व्यहवारात फारशी हुशार आणि बोलण्या वागण्यात फारशी तरतरीत नव्हती. पण सुंदर, मनमिळावू, घर नीट सांभाळणारी आणि मुख्य म्हणजे शेखरवर मनापासून प्रेम करणारी असल्याने शेखरचे ही तिच्यावर खूप प्रेम होते.

सकाळी रश्मी शेखर बरोबर कॅफेमध्ये आली. शेखर ने तिला सगळि उपकरणे व्यवस्थित दाखवली , त्यांची माहिती दिली. कॅफेमध्ये असलेल्या १२ कॉम्प्युटर पैकी ११ छोट्या क्युबिकल मध्ये होते तर एका कॉम्प्युटर साठी खास मोठी केबिन होती. शेखर या केबिन मध्ये बसून काम करी. या केबिनमध्येच विडीओ चॅटिंगसाठी लागणा-या सुविधा होत्या. केबिनचे दार लावले तर केबिन ब-यापैकी साउंडप्रुफ होत असे. त्यामुळे विडीओ चॅटद्वारे नोकरीची मुलाकात देणा-यांस शेखर ह्या केबिन मध्ये जास्त दराने बसायला देई.

शेखरने विविध उपकरणे कशी चालू करायची, कशी वापरायची , कॅफेमधल्या इतर बाबी रश्मी ला समजावल्या. पण रश्मीकरिता हे सगळेच खूप नवीन होते. शिवाय शेखर अगदी उत्तम शिक्षक होता असेही नाही त्यामुळे तिला ब-याचशा गोष्टी नीट समजल्या नाहीत आणि कॅफे सांभाळण्याचा आत्मविश्वासही तिला वाटला नाही. त्यामुळे शेखर विचारात पडला.

सायंकाळी नेहा आली. शेखर ने दोघींची ओळख करुन दिली.

“हाय रश्मी, कशी आहेस ? शेखर अरे तीन महिने झाले तुझ्या लग्नाला आणि तु आज भेटवतो आहेस तुझ्या बायकोला…”रश्मी ला न्याहाळत नेहा ने विचारले. रश्मी ला नेहाची नजर काहीशी विचित्र वाटली शिवाय शेखर ला सर किंवा निदान दादा वगैरे न म्हणता थेट नावाने हाक मारते हे तिला फारसं पटंल नाही. पण नंतर तिने तो विचार झटकून टाकला.

शेखर नंतर नेहा ला म्हणाला “नेहा, मी सात-आठ दिवसांकरिता गावाला चाललोय. मी रश्मी ला कॅफेचे काम समजावले आहे पण लगेच तिला एकटीला कॅफे सांभाळता येणं कठीण आहे. आणि तुझ्या कॉलेजला पण सुटी आहे सध्या, तर तु तीन-चार दिवस सकाळी देखील येवू शकतेस का ?”

“अर्थातच शेखर, विचारतोस काय ? हुकुम करो मेरे आका…तुम बुलाओ और हम ना आये ? एनिथिंग फॉर यू शेखर…” नेहा हसत उत्तरली.

शेखर पण हसला आणि रश्मी ला हसावं लागलं

x————————-x

पुढच्या दिवशी शेखर गावी निघून गेला. रश्मी सकाळि नऊ वाजता कॅफेजवळ आली. नेहा तिथे आधीच हजर होती. तिने लाल रंगाचा टी शर्ट, जीन्स आणि शूज घातले होते तसेच केस मोकळे सोडले होते. अशा पेहरावात ती आकर्षक आणि रुबाबदार दिसत होती. तर रश्मी ने साधासा चुडीदार घातला होता, त्याला इस्त्री पण केलेली नव्हती. एकूणातच अतिशय साधेपणामुळे रश्मी सुंदर असूनही फिकी दिसत होती.

“यू आर लेट रश्मी. अगं ८:४० च्या आधी कॅफे उघडावा लागतो.  माझ्याकडे चावी असती तर मी तरी उघडला असता”

“ओ..सॉरी. अगं थोडा उशीरच झाला, पण कस्टमर येवून निघून गेलेत की काय ?” रश्मी ने गडबडून विचारले.

“कस्टमर्स नाही आलेत अजून पण कामवाली बाई वाट पाहून निघून गेली. ती झाडू मारायला आणी फरशी पुसायला येत असते”

“अरेरे….मग आता गं ?”रश्मी अजूनच गोंधळली.

“अगं आता प्रश्न विचारत बसू नकोस. आधी कॅफे उघड आणि झाडून व फरशी पुसून घे” नेहा टोकदार आवाजात म्हणाली.

“हो…उघडते हं”

रश्मीने कॅफे उघडला आणि चपला बाहेर काढून ती आत गेली. शेखरचा नियमच होता तसा “कॅफेमध्ये कुणीच चपला बूट घालून जायचे नाही”.

पण रश्मीच्या मागे नेहा बूट न काढताच आत येवू लागली.

“अगं नेहा, कॅफे मध्ये बूट घालून नाही ना जात ?” रश्मीने विचारले.

“माहीत आहे गं मला. पण अजून तुझं झाडून पुसून व्हायचं आहे तर मी कशाला माझे पाय खराब करु ?” नेहा तो-यात म्हणाली.

रश्मीने काही उत्तर दिले नाही.  कोप-यातला झाडू घेउन ती कॅफे झाडू लागली. ती झाडत असताना नेहा कॉम्प्युटर्स, राउटर, मॉडेम ई चालू करण्यासाठी इकडून तिकडे फिरत होती. त्यामुळे अनेकदा रश्मीला झाडताना थांबवे लागले.

“झाडून झालं ना ? आता कोप-यातली बादली घे, बाहेर नळावरुन पाणी आण आणि फरशी पुसून काढ. चल लवकर कर, कस्टमर्स येतील आता” नेहा म्हणाली.

“हो घेते.” म्हणत रश्मी कामा ला लागली.

ती फरशी पुसत असताना नेहाचे इकडुन तिकडे जाणे चालू होतेच. तीन चार वेळा पुसून झालेल्या भागावर तिच्या बूटांचे ठसे उमटले आणि रश्मीला तिथे पुन्हा पुसावे लागले.

“रश्मी , इकडे ये” नेहा आता केबिन मध्ये बसली होती.

“हो. आले” म्हणत रश्मी आत केबिन मध्ये गेली.

“झाली ना फरशी पुसून ?”

“हो झाली”

“मग माझे शूज आता बाहेर ठेवून दे” पायातले बूट काढत नेहा म्हणाली.

रश्मीला हे विचित्र वाटले. अगदी शेखर देखील तिला अशी कामं सांगत नसे पण इथे तर २०-२१ वर्षांची तरूणी , तिच्या नव-याची सहायक म्हणजे एका अर्थाने त्याने कामाला ठेवलेली नोकराणी तिला म्हणजे मालकिणीला बूट उचलून ठेवायला सांगत होती.

“अगं बघतेस काय ? कळलं नाही का ? बूट उचलून बाहेर ठेव, जा” नेहाचा आवाज किंचीत चढला होता.

“हो ठेवते”  नेहाचे बूट उचलून घेत रश्मी म्हणाली. रश्मीला नाही म्हणता नाही आलं. शिवाय नेहाच्या चढ्या आवाजाने ती गोंधळुन गेली.

============================================

प्रिय वाचक,
सायबर कॅफेतल्या त्या दिवसाची सुरुवात रश्मीसाठी कशी झाली हे तुम्ही वाचले. त्या दिवसाची रोमांचक कथा आता वाचा अ‍ॅमेझॉन किंडलवर. संपुर्ण कथा फक्त आणि फक्त अ‍ॅमेझॉन किंडलवर. जर तुमच्याकडे किंडल अनलिमिटेड असेल तर तुम्ही ही कथा अगदी मोफत वाचू शकता आणि जर तुमच्याकडे किंडल अनलिमिटेड नसेल तर तुम्ही ही कथा अगदी नाममात्र मुल्यात वाचू शकता.
धन्यवाद

किंडल आवृत्तीकरिता खालीलपैकी एक लिंक क्लिक करा

https://www.amazon.in/dp/B08X3SC3PK

https://www.amazon.com/dp/B08X3SC3PK