रसिकाचे स्वयंवर

एकांकिका – रसिकाचे स्वयंवर

(प्रवेश पहिला)

(स्थळ : संदीपचे कार्यालय, वेळ दुपारी दोन-तीनच्या दरम्यान)

(संदीपचा मोबाईल फोन वाजतो)

संदीप (स्क्रीनवरचे नाव वाचत) : रसिका ? रसिकाचा फोन ?

(संदीप गडबडून उभा राहतो)

संदीप : हॅलो ..

पलीकडून : हॅलो संदीप , अरे मी रसिका बोलतेय.

संदीप (अडखळत) : हो..हॅलो..बोला, बोला ना.

पलीकडून :हाऊ आर यू संदीप ? काय करतो आहेस?

संदीप : आय अ‍ॅम फाईन. मी आता ऑफिस्मध्ये आहे. तुम्ही कशा आहात ?

पलीकडून (खणखणीत आवाजात): अरे मी मजेत..आज संध्याकाळी वेळ काढ , मला तुला भेटायचं आहे.

संदीपः हो, हो चालेल ना. भेटूयात. कधी ?आणि कुठे ?

पलीकडून (खणखणीत आवाजात): दॅट्स गूड. अं….अस करु सहानंतर , माझ्या घरी. मी तुला पुन्हा फोन करुन सांगेन नक्की किती वाजता यायचंस ते.

संदीप : हो..ओके.

पलीकडून : चल बाय..

संदीप : हॅलो…हॅलो..

(संदीप मोबाईलकडे बघत मोबाईल खाली ठेवतो आणि खुर्चीत बसतो)

संदीप (स्वगत) : रसिकाला काय बोलायचं असेल ? आज दहा दिवस झालेत ‘बघण्याचा’ कार्यक्रम होवून. मला तर पाहताच क्षणी ती आवडली. आणि वेळ न दवडता मी माझा होकार कळविला देखील. पण रसिकाकडून काहीच उत्तर आलं नाही. खरं तर तिच्यापेक्षा दोन-तीन इंचानी माझी उंची कमी, मुली स्वतःपेक्षा कमी उंचीचं स्थळ सहसा बघत नाहीत. पण मध्यस्थांकडून काहीतरी गडबड झाल्यानेच हा बघण्याचा कार्यक्रम झाला. पण मला रसिका खूप आकर्षक वाटली. तिला पाहिल्यापासून तिचा विचार मनातून जात नाहीये. मी माझा होकार मध्यस्थांमार्फत त्वरीत कळवला. मी तिचं उत्तर ऐकायला खूप आतूर झालो आहे. न राहवून मी तिला दोन-तीन एस एम एस पाठवलेत. पण तिचं उत्तर नाही आलं…

(काही क्षण थांबून) तिला मी आवडेन का ? ती इतकी सुंदर आहे, ती माझ्यापेक्षा चार-पाच वर्षांनी लहान, माझ्यापेक्षा उंच. आणि माझी पर्सनॅलिटी ही अशी..तिशी ओलांडली आहे, डोक्यावरचे केस विरळ होत आहेत. तिला माझ्यापेक्षा जास्त देखणा मुलगा सहज मिळेल. ती का मला होकार देईल…?

(एक उसासा सोडत)…हं…तसंही माझ्या हातावरची ही रेषा कमजोरच आहे. दोनवेळा प्रेमात पडलो पण प्रेम एकतर्फीच राहिले. मग अ‍ॅरेंज्ड मॅरेजचा विचार केला. २-३ बर्‍यापैकी चांगली स्थळं आलीत पण त्यांच्याकडून होकार मिळाला नाही. आणि ज्या स्थळांकडून आग्रह धरला गेला त्या मुली मला बिलकूलच आवडल्या नाहीत.

पण रसिका या सगळ्या मुलींपेक्षा वेगळी , जास्त आकर्षक वाटली. फक्त सौंदर्यच नाही तर एक वेगळेच व्यक्तिमत्व आहे तिचे. तरतरीतपणा, आत्मविश्वास आणि काहीसा रुबाब जाणवला मला तिच्या बोलण्या वागण्यात. ती मध्यमवर्गातली असली तरी तिचं व्यक्तिमत्व खूप वेगळं आहे ..जणू एखाद्या मोठ्या श्रीमंत घरातील मुलीचा असावं. बघण्याच्या कार्यक्रमात जेव्हा आम्ही एकांतात बोलत होतो तेव्हा ती सहजपणे माझ्याशी एकेरीत बोलू लागली. मी मात्र तिला ‘अहो-जाओ’ म्हणत होतो. मला थोडं आश्चर्य वाटलं , पण त्याहून जास्त छान वाटलं. ती मला प्रश्न विचारत होती तेव्हा नोकरीकरिता मुलाखात घेणा-या चा असावा असा तिचा अविर्भाव होता आणि मी एखाद्या नवख्या उमेदवाराप्रमाणे काहीसा चाचरत उत्तरं देत होतो. पण नक्कीच तो एक वेगळा अनुभव होता. मी खूप रोमांचित झालो होतो.

आता काय बोलायचं असेल तिला ? ती मला होकार देईल ? की मी तिला एस एम एस पाठवलेत म्हणून ती नाराज झाली असेल आणि तेच बोलायला मला बोलावलं असेल ? ती रागावली तर मी काय करु ? ऐकून घेईन.. घ्यावंच लागेल. तिला उलटून बोलायची हिंमत तर मी नाही करु शकणार. आणि मला ते करायचं पण नाही. खाली मान घालून माफी मागेन..

हं… काही समजत नाहीये… आता सहा वाजण्याची वाट पहातो फक्त.

 

(वेळ सायंकाळची)

संदीप : सहा वाजून गेलेत अजून रसिकाचा कॉल आला नाही.

(थोड्या वेळाने) तिचा भेटायचा विचार तर बदलला नसेल ना ? मी तिला कॉल करुन विचारु का ?पण नको.. तिला नाही आवडलं तर ? मी अजून थोडा वेळ वाट बघतो.

(संदीपचा फोन वाजतो)

पलीकडून : हाय संदीप

(संदीप उठून उभा राहतो)

संदीप : हाय , हाय रसिका

पलीकडून : वेल.. तू सात वाजता माझ्या घरी ये.

संदीप : सात वाजता ?

पलीकडून : दॅट्स राईट. ठीक सात वाजता. बाय..

संदीप (फोन ठेवत) : अरे बापरे, सात वाजायला फक्त दहा मिनीट आहेत…

(संदीप गडबडीने निघतो)

(प्रवेश दुसरा)

(स्थळ : रसिकाच्या घरातील बैठकीची खोली. रसिका आणि तिची धाकटी बहिण निशा सोफ्यात बसलेल्या आहेत)

निशा : ताई, तू जिजूना आज होकार देणार आहेस ना ?

रसिका : जिजू ? कोण जिजू ?

निशा : अगं असं काय करतेस ? संदीप जिजू ना…तू बोलावलं आहेस ना त्यांना आज. ?

रसिका : ते काही तुझे जिजू नाहीत, त्याला जिजू म्हणू नकोस.

निशा : जिजू नको म्हणू तर काय म्हणू ?

रसिका : संदीप नाव आहे त्याचं. माहीत नाही का तुला ?

निशा : अगं ताई पण मी त्यांना संदीप कसं म्हणू ? ते किती मोठे आहेत माझ्यापेक्षा..

रसिका : मग काहीच नको म्हणूस. गप्प बैस.

निशा : पण तु त्यांना होकार दिलास की तुमचं लग्न होईल आणि मग ते माझे जिजूच होतील ना ?

रसिका : तुला कुणी सांगितलं मी त्याला होकार देणार आहे म्हणून ?

निशा : पण ते तुला आवडले आहेत ना ? आणि तू त्याना बोलावलं आहेस ते होकार देण्यासाठीच ना ?

रसिका : आम्ही फक्त भेटून बोलणार आहोत. आणि तुझी क्लासची वेळ झाली आहे, तू क्लासला जा बरं.

निशा : ए ताई , मी थांबते ना थोडा वेळ. तू त्यांना होकार दिलास की मला खूप आनंद होईल.

रसिका (वैतागून) : तुला सांगितलेलं कळत नाही का ? जा म्हंटंलं ना तुला ?

निशा : ताई , एक सांगू ? तुझ्या मनात काय आहे याचा मला अंदाज आहे, आणि माझ्या इथे असण्याचा तुला नक्की उपयोगच होईल बघ.

रसिका (निशाचा कान पिळत) : तुझा आगाऊपणा वाढलाय. मार पडल्याशिवाय ऐकायचंच नाही हे तू ठरवलयस का ?

(दार वाजते, रसिका निशाचा कान सोडते. निशा आत जाते)

संदीप : मी आत येवू का ?

रसिका : ओ.. हाय संदीप

(संदीप आत येवून सोफ्यात बसू लागतो)

रसिका : थांब संदीप. मी तुला अजून बसायला सांगितलं नाहीये.

(संदीप गडबडून मागे सरकतो)

रसिका : यू आर लेट. १० मिनटे उशीर झालाय तुला

संदीप : अं ..हो.. सॉरी. मी तुमच्या कॉलची वाट बघत ऑफिसमध्ये थांबलो होतो. आणि कॉल आल्यावर घाइने निघालो. पण तरी उशीर झालाच. ट्रॅफिक पण होतं बरंच.

रसिका : पण तू ऑफिसमध्येच का थांबलास ?

संदीप : म्हणजे ?

रसिका : म्हणजे माझ्या कॉलची वाट बघत ऑफिसमध्येच का थांबलास ? इथे माझ्या घराच्या बाहेर थांबूनही वाट बघू शकत होतास. ऑफिसच्या A/C मध्येच थांबायला हवं होतं का तुला ?

संदीप : नाही. तसं नाही रसिका. पण आपली वेळ नक्की ठरली नव्हती ना. फक्त सहा नंतर भेटू इतकंच बोललो होतो आपण.

रसिका : मग ? सहा नंतर भेटू असं म्हणाले होते ना मी ? मग सात, किंवा आठ किंवा नऊ वाजेपर्यंत बोलवेन मी. माझ्या घराबाहेर वाट बघत एक-दोन तास थांबायची तयारी नाही का तुझी.

संदीप (मान खाली घालून) : सॉरी …चुकलं माझं.

रसिका : हं.. मग आता चुक सुधार. जा. बाहेर जावून थांब.

संदीप : हो जातो. आणि कधी परत आत येवू ?

रसिका : मी कॉल करुन बोलवेन तुला. मी दहा मिनटानी बोलवेन किंवा कदाचित दोन तासांनी बोलवेन पण मी कॉल केला की तू लगेच यायला हवं, अगदी एका मिनटात.

संदीप : हो..ठीक आहे

रसिका (चुटकी वाजवत) : निघ आता…आउट !!

(संदीप निघून जातो)

(रसिका येरझार्‍या घालू लागते)

रसिका (स्वगत) :हं.. माझा अंदाज खरा ठरतोय तर. हा संदीप माझ्या प्रेमात वेडा झालाय आणि मी म्हणेल ते ऐकायची तयारी आहे त्याची. तो नेहमीच माझ्यापुढे मान तुकवून , नम्रपणे माझ्या आज्ञांचं पालन करेल असं दिसतंय. आतापर्यंत माझ्या प्रेमात पडून मला प्रपोज करणार्‍या तीन मुलांना मी नकार दिला, अ‍ॅरेंज्ड मॅरेजकरीता बघायला आलेल्या चार मुलांना नाकारलं….माझं मन कुठेतरी अशा मुलाचा शोध घेत होतं. माझ्यावर मनापासून प्रेम करणारा, माझ्या प्रेमात वेडा होवून माझा प्रत्येक शब्द झेलणारा, थोडक्यात माझा गुलाम बनणारा. कदाचित संदीपच तो मुलगा आहे.

पण इतक्या लवकर निष्कर्ष काढणे योग्य होणार नाही. त्याची अजून नीट परीक्षा करायला हवी.

(रसिका टीव्हीपाशी /टेबलापाशी येते, तेथे ठेवलेली छडी हातात घेते)

खरं तर थोडी कठीणच परीक्षा घ्यायला हवी..

असो. आता त्याला आत बोलावते नाहीतर बोलायला आणि परीक्षा घ्यायला फारसा वेळ मिळणार नाही.

(छडी जागेवर ठेवते)

(रसिका कॉल लावते)

रसिका (कॉलवर) : संदीप, तू आता आत ये.

(संदीप आत येवून उभा रहातो)

रसिका : हं… बस.

संदीप : थँक यू.

रसिका : हं.. सॉरी मी तुला मघाशी पाणीदेखील नाही विचारलं आणि बाहेर उभ रहायची शिक्षा केली.

संदीप : शिक्षा ? शिक्षा होती का ती ?

रसिका (हसून) : मग तुला काय बक्षीस वाटलं का ते ?

संदीप : तुमच्या सांगण्यावरुन तुमची वाट बघत उभं राहयला चांगलं वाटलं.

रसिका : अरे वा , मग उगाच बोलवलं तुला लवकर … जा पुन्हा बाहेर जावून उभा रहा.

(संदीप उठून बाहेर जावू लागतो)

रसिका (स्वर काहीसा उंचावलेला) : आणि यावेळी कान पकडून उभा रहा. समजलं ?

संदीप (मान खाली घालून) : ठीक आहे.. जातो.

रसिका (मोठ्याने हसत) : अरे वेड्या. थट्टा केली. ये बस..

(संदीप सोफ्यात बसतो)

रसिका : मी पाणी आणते तुझ्यासाठी.

(तितक्यात निशा ट्रे घेवून आत येते)

निशा : त्याची गरज नाही. मी आली आहे, माझ्या जि़जूंसाठी पाणी घेवून..

रसिका (ओरडून) : निशा तुला मी काय म्हंटलं ते समजलं नाही का ? आणि तू अजून इथे का आहेस ? क्लासला का गेली नाहीस ?

निशा : ताई प्लीज, थांबू दे ना मला घरी. मी तुम्हाला डिस्टर्ब नाही करणार.

रसिका : तू अशी नाही ऐकणार. तुझा आगावूपणा वाढत चालंलाय. तुला आता फटकेच हवेत. ती छडी आण इकडे.

निशा (घाबरुन) : सॉरी ताई. प्लीज मारु नकोस ना. मी जाते क्लासला.

रसिका : क्लासला तर जावच लागेल पण त्याआधी फटके खावे लागतील. चल छडी आण लवकर. उगाच नाटकं केलीस तर शिक्षा वाढेल, माहीतीये ना तुला ?

निशा : सॉरी ताई.

संदीप : रसिका तुम्ही प्लीज निशाला

रसिका (संदीपचे वाक्य तोडत) : शट अप संदीप. तू मध्ये बोलू नकोस.

(निशा छडी घेवून येते. छडी रसिकाकडे देवून निशा तिच्यासमोर गुडघे टेकून उभी राहते आणि उजवा हात पूढे करते)

रसिका : गूड….एक

(रसिका निशाच्या तळहातावर छडीने जोरात फटका देते, निशा कळवळते)

रसिका : दोन ….तीन .. चार…पाच. हं दुसरा हात कर पुढे. क्लासला निघाली आहेस म्हणून जास्त शिक्षा नाही करत आज.

(निशा रडतच मान डोलावते आणि दुसरा हात पूढे करते)

(रसिका निशाच्या दुसर्‍या हातावर पाच फटके देते आणि त्यानंतर छडी निशाकडे देते. निशाच्या छडी जागेवर ठेवून आत जाते)

(एक-दोन मिनटे शांतता. रसिका आत जाते. निशा बाहेर येते, तिच्या हातात काही वह्या आहेत.)

निशा (इकडे तिकडे बघत) : ताई किचनमध्ये आहे वाटतं. मी क्लासला निघालेय. ताई बाहेर आली की तिला सांगाल प्लीज ?

संदीप : हो.. निशा फार लागलं का गं ? रसिकाने उगाच तुला इतकं मारलं..

निशा : नाही. ताईने सांगितलं होतं मला पण मीच हट्टीपणा केला. मग ताई शिक्षा करणारच ना. बाकी अशा शिक्षेची सवय आहे मला. आज तरी नेहमीपेक्षा खूप कमी फटके पडलेत.

संदीप : तुझी ताई नेहमीच तुला धाकात ठेवते का ?

निशा : माझे बाबा गेलेत तेव्हा मी फार लहान होते. पाच-सहा वर्षांची असेन आणि ताई चौदा-पंधरा वर्षांची. आई नौकरी करुन पैसे कमविण्यात व्यस्त असायची तेव्हा घरची सगळी जबाबदारी ताईनेच घेतली. ताईनेच मला वळण लावले. ती खूप प्रेमळ आहे. माझी काळजी घेते, मला जीव लावते, पण तितकीच कठोरसुध्दा.. तिच्याकडून शिक्षा घेत घेतच मी मोठी झाले. तसं मी तिचं सगळं ऐकते. पण कधी हट्टीपणा केला की मग मिळतो प्रसाद.

संदीप : तरीपण तुझ्या ताईने तुला निदान माझ्यासमोर तरी शिक्षा करायला नको होती. माझ्यासमोर मार पडल्याने तुला जास्तच वाईट वाटलं असेल.

निशा (क्षणभर विचार करते, मग एकदम आनंदाने टाळी वाजवते) : नाही..उलट मला छान वाटलं आता..

संदीप (आश्चर्याने) : काय ?

निशा : ताईने मला आजपर्यंत कधीच बाहेरच्या कुणा व्यक्तीसमोर मारलेलं नाहीये. अगदी साधा धपाटादेखील नाही. पण आज तिने मला तुमच्यासमोर शिक्षा केली. याचा अर्थ ती तुम्हाला परकं समजंत नाही. म्हणजेच तिचा तुम्हाला होकार आहे तर…(क्षणभर थांबत) वा.. माझ्या ताईला आज तिचा आयुष्याचा जोडीदार मिळाला. या आनंदात तर मी पट्टीच काय पट्ट्याचा मार पण आनंदाने खाईन.

संदीप : पट्ट्याचा मार ?

निशा : हो…म्हणजे असं बघा की मी एखादी लहानशी चूक करते तेव्हा ताई थोडे धपाटे घालते किंवा उठाबशा काढायला लावते किंवा अंगठे धरुन उभं करते. साधारण आठवड्यातून एकदा अशी शिक्षा मिळते. त्यापेक्षा जास्त आगावूपणा किंवा हट्टीपणा केला की मग आता मिळाले तसे छडीचे फटके मिळतात. हा प्रोग्राम होतो महिन्यातून एक-दोनदा आणि मग चार पाच महिन्यातून एकदा होते मेगा-फाईनल.

संदीप : मेगा-फाईनल ?

निशा : त्यावेळी तिचा पट्टा म्हणजे बेल्ट घेते आणि मला मस्त फोडून काढते.

संदीप : बापरे ? पट्ट्याचा मार खातेस तू ? खूप लागत असेल ना.

निशा : हो तर.. ताई बेल्टने सपासप वीस-पंचवीस फटके देते. पाठीवर आणि पायावर आठ-दहा दिवस तरी वळ राहतातच.

(संदीप अवाक होवून काहीच बोलत नाही)

निशा : बरं मी आता जाते ,नाहीतर आताच होईल मेगा-फाईनल.

(निशा जाते)

(सोफ्यात बसताना रसिकाचा टीपॉयला धक्क लागतो आणि टीपॉयवरचा ग्लास कलंडून पाणी सांडते)

रसिका (सोफ्यात बसत) : ओफ ओ…पाणी सांडलं…संदीप एक काम कर बर.

संदीप : काय ?

रसिका : आत किचनमध्ये ओट्यावर एक फडकं असेल ते घेवून ये.

(संदीप आत जातो आणि फडकं घेवून येतो आणि रसिकासमोर उभा राहतो)

रसिका : अरे बघत काय उभा राहिलास ? टीपॉय आणि फरशीवरचं पाणी पुसून काढ लवकर

संदीप : अं..हो..

(संदीप टीपॉय आणि फरशीवरचं पाणी पुसून काढतो त्यानंतर फडकं टीपॉयवर ठेवून सोफ्यात बसू लागतो)

रसिका (त्रासलेल्या आवाजात) : काही कॉमन सेन्स नाहीये का तुला ?हे फडकं असं टीपॉयवर ठेवायचं असतं का ? जा आत जागेवर ठेवून ये ते.

संदीप : सॉरी..

(संदीप आत जावून फडकं ठेवून येतो)

रसिका : मी तुला अजून काहीच उत्तर दिलं नाही मात्र आज घरी भेटायला बोलावलं, तुला आश्चर्य वाटलं असेल ना ?

संदीप : हो. आश्चर्य तर वाटंलं, पण अजून तुम्ही नकार दिला नाहीत म्हणजे होकाराची शक्यता आहे हे समजून आनंद पण झाला.

(रसिका हसते)

रसिका (संदीपकडे रोखून बघत): हं..खूप स्वप्न रंगवत आहेस तर माझ्या होकाराची ?

(संदीप वरमून खाली पाहू लागतो, पण काहीच बोलत नाही)

रसिका : वेल.. माझं उत्तर ऐकण्यासाठी खूपच आतूर झाला असशील ना

(संदीप हलकेच मान हलवतो)

रसिका : आणि माझं उत्तर मिळण्याआधीच तु तर मला एस.एम.एस पण पाठवलेस खूप सारे…पण नंबर तर मला मागितला नव्हतास. मध्यस्थांकडून घेतलास, हो ना ?

(संदीप मानेनंच होकार देतो , अस्वस्थ होवून हातांचा चाळा करु लागतो)

रसिका : मला विचारलं होतंस मेसेजेस पाठवू का म्हणून ?

संदीप : नाही. सॉरी. चुकलं माझं. तुम्हाला नाही आवडलं का ?

रसिका (किंचित हसत) : वेल ..हे…तुझे मेसेजेस..हा पहिला “रसिका, मी तुम्हाला माझा होकार कळविला आहे. मध्यस्थांकडून तुम्हाला निरोप मिळाला असेलच. तुमच्या उत्तराची वाट पाहत आहे”.. त्यानंतर दोन दिवसांनी “मला खरंच तुम्ही खूप आवडलात. तुम्हाला मी आवडलो की नाही माहीत नाही. तुमचा होकार मिळणं हे मी माझं भाग्य समजेन” .. आंणि मग पुन्हा दोन दिवसांनी हा “रसिका, मी तुमच्या उत्तराची आतुरतेने वाट पहात आहे. मी तुमच्या प्रेमात वेडा झालोय. तुमचा नकार तर नाहीये ना ? तुमचाच , संदीप”

आणि मग हे प्यार-ईष्क वाले तीन-चार शेर. हे तर तु फॉर्वर्ड केले असशील ना ? तुझी तर काय इतकी अक्कल वाटत नाही.

(संदीप अजुनही मान खाली घालून बसलेला आहे, हातांचा चाळा वाढला आहे)

रसिका : का पाठवलेस मला असे मेसेजेस ?

(संदीप काहीच बोलत नाही)

(रसिका उठून संदीपजवळ येवून उभी रहाते, संदीप गडबडून उभा राहतो, त्याचे हात कापू लागतात)

रसिका (आवाज किंचित चढलेला) : काय विचारतेय मी, प्रश्न कळला नाही का ?का पाठवलेस मला असे मेसेजेस ? तुझी हिंमत कशी झाली मला असे मेसेजेस पाठवायची ?

संदीप (आवंढा गिळत) : सॉरी…चुक झाली माझी. पुन्हा नाही पाठवणार.

रसिका : सॉरी ? आता सॉरी म्हणून काय होणार ? तुला आज धडा शिकवते. तुला आज तुझ्या आगावूपणाची शिक्षा देणार आहे मी.

(संदीप मान खाली घालून उभा आहे, काहीच बोलत नाही)

रसिका : चल जमिनीला गुडघे टेकून उभा रहा.

(संदीप काहीच करत नाही, रसिका त्याचा कान पकडून पिरगाळते)

रसिका (ओरडून) : काय सांगितलं तुला कळत नाही का ? गुडघे टेकून उभा रहा लगेच

संदीप : हो… हो..

(संदीप गुडघे टेकून उभा राहतो. रसिका त्याचा कान सोडते)

रसिका : चल आत दोन्ही कान धर

(संदीप कानाजवळ हात नेतो)

रसिका : कानावर हात ठेवायला सांगितलं नाहीये, कान पकडायला सांगितलं आहे.

संदीप :हो..सॉरी

रसिका : से “सॉरी मॅम..” मी तुला शिक्षा करत असताना तू मला मॅम म्हणायचंस. कळालं ?

संदीप : हो…हो मॅम. सॉरी मॅम.

रसिका : दॅट्स गूड.

(काही क्षण तसेच जातात, संदीप कान पकडून , गुडघे टेकून आणि मान खाली घालून उभा आहे. रसिका पुन्हा सोफ्यात येवून बसते. तिच्या देहबोलीतून अधिकार जाणवत आहे)

रसिका : संदीप ..

संदीप : मॅम ..

रसिका : आता तुझी शिक्षा सांगते. त्या शेवटच्या एस एम एस मध्ये जे लिहलं आहेस ना ते आता बोल.

संदीप : काय ?

रसिका : तू जो तिसरा मेसेज पाठवला होतास तो जसाच्या तसा बोल, मोबाईल मध्ये न पाहता. एक पण चूक व्हायला नको. कळलं ?

संदीप : हो ..हो मॅम.

रसिका (मोबाईल हातात घेत) : हं ..कर चालू.

संदीप : मी तुमच्या उत्तराची वाट पहात आहे. मी तुमच्या प्रेमात वेडा झालोय. तुमचाच , संदीप

रसिका : अरे अरे.. किती चुका. चल पुन्हा बोल.

संदीप : मी तुमच्या उत्तराची वाट पहात आहे. मी तुमच्या प्रेमात वेडा झालोय. तुमचा नकार तर नाहीये ना ? तुमचाच , संदीप

रसिका : नाही…अजून पण बिनचूक नाही. नीट आठव आणि बोल. आता चुकलास तर बघ.

संदीप : रसिका, मी तुमच्या उत्तराची आतुरतेने वाट पहात आहे. मी तुमच्या प्रेमात वेडा झालोय. तुमचा नकार तर नाहीये ना ? तुमचाच , संदीप

रसिका (हसत) : अरे व जमलं की..आता चुकला असतास तर छडीने फटकवलं असतं…गुड. चल अजून एकदा म्हण.

संदीप : रसिका, मी तुमच्या उत्तराची आतुरतेने वाट पहात आहे. मी तुमच्या प्रेमात वेडा झालोय. तुमचा नकार तर नाहीये ना ? तुमचाच , संदीप

रसिका : छान. आता मी थांबायला सांगत नाही ना तोपर्यंत चालू राहू देत.

संदीप : रसिका, मी तुमच्या उत्तराची आतुरतेने वाट पहात आहे. मी तुमच्या प्रेमात वेडा झालोय. तुमचा नकार तर नाहीये ना ? तुमचाच , संदीप

रसिका : हं. हं..

संदीप : रसिका, मी तुमच्या उत्तराची आतुरतेने वाट पहात आहे. मी तुमच्या प्रेमात वेडा झालोय. तुमचा

(तितक्यात संदीपचा फोन वाजतो. तो कान सोडून खिशातून फोन काढतो. ऑफिसमधून कॉल आलेला असतो. संदीप कॉलवर बोलू लागतो , रसिका चिडून चुटकी वाजवत त्याला कॉल बंद करण्यासाठी खुणावते. संदीप घाईने बोलणं आवरतं घेत फोन ठेवतो)

रसिका (संदीपच्या जवळ येत) : काय चालंलय तुझं हे ? कॉल का घेतलास ?

संदीप : सॉरी , ऑफिसमधून होता. थोडं महत्वाचं होतं

रसिका (संदीपचा कान पिळते): फर्स्ट , से सॉरी मॅम.

संदीप : सॉरी मॅम

रसिका (कान पिळतच) : कॉल महत्वाचा होता ?

संदीप : हो..हो मॅम.

रसिका (कान सोडते): म्हणजे मी तुला इथे बोलावलंय आणि तुझ्याशी बोलतेय ते महत्वाचं नाहीये का ?

संदीप : नाही ..मॅम

रसिका : ओके देन..गेट आऊट.

संदीप : सॉरी मॅम. मला म्हणायचं होतं की आपलं बोलणं महत्वाचं आहे.

रसिका : मग ? कॉल का रिसिव्ह केलास ? ऑफिसमध्ये बॉससमोर असेच कॉल रिसिव्ह करतोस का ?

संदीप : नाही मॅम.

रसिका : ऑफिसमध्ये मीटिंगला जाताना फोन स्विच ऑफ किंवा सायलेंट करतोस की नाही ?

संदीप : हो, करतो मॅम.

रसिका : बॉस समोर असताना फोन वाजला आणि बॉसला न विचारता रिसिव्ह केला तर काय होईल रे ?

संदीप : बॉस रागवतील मॅम.

रसिका : आणि आता मी काय करेन ?

संदीप : तुम्ही पण रागवणार मॅम

रसिका : मी तुझ्या बॉसपेक्षा जास्त रागवेन की कमी रागवेन ? सांग बर काय वाटतं तुला ?

(संदीप काहीच बोलत नाही)

रसिका : बोल..काय विचारतेय मी ?

संदीप : तुम्ही बॉसपेक्षा जास्त रागवाल मॅम

रसिका : का बरं ? मी जास्त रागवेन असं का वाटतं तुला ?

संदीप : मॅम बॉसपेक्षा तुमचा अधिकार जास्त आहे

रसिका : अरे वा..काय मस्त उत्तर दिलंस…आवडलं मला तुझं उत्तर.

संदीप (हळूच मान वर करत) : थँक्स , थँक्स मॅम.

रसिका : तुझ्या या उत्तरावर खूष होवून तुझी शिक्षा माफ …

संदीप : थँक्स मॅम.

रसिका : अरे अरे.. मी वाक्य पुर्ण नाही केलं अजून…हं तर मी म्हणत होते की तुझ्या या उत्तरावर खूष होवून तुझी शिक्षा माफ करेन किंवा कमी करेन असं तुला वाटत असेल तर तसं होणार नाही बरं

(संदीप खजील होवून मान खाली घालतो)

रसिका : ए तू कानाखाली खाल्ली आहेस का कधी ? आय मीन कुणा मुलीकडून ?

(संदीप मानेनंच नकार देतो )

रसिका : वॉव…म्हणजे तुझ्या आयुष्यात तुला आज एक नवीन अनुभव मिळणार आहे तर..

(संदीप आवंढा गिळतो)

रसिका (उजवा तळहात पुढे करत) : काय वाटतं तुला ? किती लागत असेल एका मुलीचा हात ?

(संदीप मान उंचावून पुन्हा खाली घालतो)

रसिका :बरं ते तुला आता कळेलच लवकर… पण आपण आधी एक काम करु तुझ्या चुका मोजूयात. चल तुच मोज बर तुझ्या चुका.

(संदीप काही बोलत नाही. अस्वस्थ होवून हाताचे चाळे करत राहतो)

रसिका : अरे ? काय झालं ? खूपच घाबरलास की काय ? (मोठ्याने हसत) जा किचनमध्ये जावून पाणी पिवून ये, घशाला कोरड पडली असेल भीतीने..

(संदीप नकरार्थी मान हलवतो)

रसिका : अरे खरंच जा. पाणी पिवून ये. गरज आहे तुला त्याची

संदीप (पुटपुटत) : नाही, नको.

रसिका : अरे जा म्हंटलं ना. आणी मला पण एक ग्लास पाणी घेवून ये येताना. (स्वतःच्या तळहाताकडे बघत) आता माझीपण मेहनत होणार आहे..चल जा लवकर.

(रसिका सोफ्यात बसते)

(संदीप आत जातो. काही क्षणांनी बाहेर येवून पाण्याचा ग्लास रसिकासमोर धरतो)

संदीप : मॅम ..पाणी

रसिका : हं.. तु चालू कर तुझ्या चुका मोजायला..मी पाणी पिते

(रसिका हळूहळू पाणी पिते)

रसिका : हं ..चल कर चालू लवकर.

संदीप : हो..हो मॅम. मी फोन सायलेंट मोडवर ठेवला नव्हता , फोन वाजल्यावर तो रिसिव्ह केला तुम्हाला न विचारता आणि कान पकडलेले होते ते तुम्हाला न विचारता सोडलेत.

(रसिका पाणी पिवून ग्लास संदीपसमोर धरते, संदीप तत्परतेने तिच्याकडून ग्लास घेवून टीपॉयवर ठेवतो)

रसिका : बस ? इतक्याच चुका केल्यास तू ?

संदीप : हो मॅम..

रसिका : तू पाच चुका केल्यास.

संदीप : नाही मॅम.. तीन केल्यात. (बोट मोजू लागतो) फोन सायलेंटवर नाही ठेवला, तुम्हाला न विचारता कॉल रिसिव्ह केला आणि कान सोडलेत…तीनच मॅम

(रसिका संदीपजवळ येते काही क्षण थांबते. त्याच्या हनुवटीला धरुन अलगद त्याची मान वर उचलते. पुन्हा एक दोन क्षण थांबून काडकन संदीपच्या कानाखाली वाजवते)

रसिका : निदान फोन ठेवल्यावर तू पुन्हा कान पकडायला हवे होतेस. ते तू केलं नाहीस ही तुझी चौथी चूक. आणि आता चुका मोजण्यावरुन माझ्याशी प्रतिवाद केलास ही तुझी पाचवी चूक…कळालं ? (असं म्हणतच रसिका पुन्हा एकदा संदीपच्या कानाखाली वाजवते)

रसिका :चल आता तुझी शिक्षा सुरु करुयात. मी तुला पाच कानाखाली वाजवणार. तू मोठ्याने मोजायच्यास. कळालं ?

(संदीप काहीच बोलत नाही. रसिका पुन्हा एक कानाखाली वाजवते)

रसिका : अरे मोज की ? मोजता येतं ना ? (असं म्हणत ती पुन्हा एक कानाखाली वाजवते)

संदीप : च..चार

रसिका : काय ? चार ? कोणत्या शाळेत शिकलास तू चार पासून मोजायला ? (पुन्हा एक कानाखाली)

संदीप : एक.

रसिका : काय पुटपुटलास रे ? मला ऐकायला नाही आलं..छान खणखणीत आवाजात मोज बरं.. पाणी पिवून आलायस ना ? (कानाखाली)

संदीप (मोठ्या आवाजात) : दोन

रसिका : पुन्हा तेच ?एक कधी म्हणालास ? (कानाखाली)

संदीप : एक

रसिका : दॅट्स गुड नाउ (कानाखाली)

संदीप : दोन

(कानाखाली)

संदीप : तीन

(कानाखाली)

संदीप : चार

(कानाखाली)

संदीप : पाच

रसिका : गुड…अरेरे…पण एक चूक झालीरे. मी तुझ्या एकाच गालावर सगळ्या थप्पड लावल्यात. असं कसं चालेल ? चल आता दुसर्‍या गालावर पण लगावते…नीट मोज.

(रसिका दुसर्‍या गालावर कानाखाली वाजवते)

संदीप : एक

(कानाखाली)

संदीप : दोन

(कानाखाली)

संदीप : तीन

(कानाखाली)

संदीप : चार

(कानाखाली)

संदीप : पाच

रसिका :व्हेरी गुड संदीप..व्हेरी गुड..तु तुझी शिक्षा हिमतीने आणि विनातक्रार पुर्ण केलीस.

संदीप : थँक यू मॅम

रसिका :चल आता पुन्हा एकदा कान पकडून गुडघे टेकून उभा रहा.

संदीप : यस मॅम..

(संदीप कान पकडून गुडघे टेकून उभा राहतो)

(रसिका शांतपणे सोफ्यात बसते. काही क्षण शांततेत जातात)

रसिका : मग संदीप , कसं वाटतंय आता ? आयुष्यात प्रथमच एखाद्या मुलीकडून इतका मार खाल्लास…

संदीप : मॅम, माझ्या चुकीची शिक्षा मला मिळाली. आणि तुमचा अधिकार आहे तो..

रसिका : ओह..आय सी…

(काही वेळ शांतता)

(रसिका सोफ्यातून उठून संदीप जवळ येते)

रसिका (मोठ्याने हसत): आजपर्यंत असंख्य प्रियकरांनी आपल्या प्रेयसीला तिच्यासमोर गुडघे टेकून प्रपोज केलं असेल..कुणाला प्रेयसीचा होकार तर कुणाला तिच्याकडून थप्पड मिळाली असेल. पण प्रयसीकडून थप्पड आणि होकार दोन्हीही एकाच वेळी मिळालेला बहूधा तूच पहिला होवू शकतोस.

संदीप : म्हणजे ? मॅम तुमचा होकार आहे ?

रसिका : अजून नाही…पण माझ्या स्वयंवराची पात्रता फेरी तु यशस्वीपणे पार केली आहेस. तुझी विनम्र वृत्ती, आज्ञाधारकपणा आणि मुख्य म्हणजे तुझं हे समर्पण याने मी प्रसन्न झाली आहे.

संदीप : थँक यू मॅम…माझा तर विश्वासच बसत नाही…

(संदीप कान सोडतो आणि रसिकाच्या पायाशी वाकतो)

रसिका : हे काय करतोयस तू ?

संदीप : मॅम मी तुमच्या पायांना किस करु शकतो.

रसिका (कानाखाली वाजवत) : नाही… आणि मी कान सोडायला सांगितले नव्हते. मला न विचारता का सोडलेस ?

संदीप (पुन्हा कान पकडतो) : सॉरी मॅम..

रसिका : माझ्या स्वयंवरातली अतिशय कठीण परीक्षा तुला अजून पार करायची आहे. आणि ते शिवधनुष्य तू पेलवू शकलास तरच मी तुला होकार देईन. ह्या परीक्षेत तुझं प्रेमातलं समर्पण , तुझी सहनशक्ती यांचा कस लागणार आहे.

संदीप : हो मॅम. मी कोणतीही परीक्षा देण्यास तयार आहे.

रसिका : गुड… आता मी बेल्ट घेवून येते.

संदीप : ओह.. मेगा फायनल ?

रसिका (हसत) : अरे वा.. निशाने तुला सांगितलेलं दिसतंय मेगा फायनलबद्दल.तिनेच दिलेलं नाव आहे हे. मी तिला बेल्टने फोडून काढते आणि ती मात्र त्याला प्रेमाने ‘मेगा फायनल’ म्हणते. खूपच गोड मुलगी आहे माझी निशा. बरं मी येतेच बेल्ट घेवून. तू मनाची तयारी कर..पुढचा किमान अर्धा तास तरी तुझ्यासाठी फार कठीण आहे.

(रसिका आत जावून येते, आता तिच्या हातात एक लेडीज बेल्ट आहे)

रसिका : आता हा बेल्ट तुझ्या पाठीशी खेळेल. उभे, आडवे असंख्य वळ तुझ्या शरीरावर उमटवेल. किती वेळ मी फटके देत राहीन ते मलाही माहीत नाही. मी मनसोक्त मारत राहीन आणि तू फटके खात रहायचंस. माझ्यावर प्रेम केल्याचं हे बक्षीस आणि शिक्षाही…तु जर सहन करु शकला नाहीस आणि मला थांबायची विनंती केलीस तर मी थांबेन, पण मग ही आपली शेवटची भेट असेल आणि यापुढे तु मला तोंड दाखवणार नाहीस. सांग आहेस तयार ?

संदीप : मॅम… हा बेल्ट ?

रसिका : हो.. का ? घाबरलास आताच ?

संदीप : नाही मॅम.. पण हा बारिकसा लेडीज बेल्ट आहे. याचे फटके माझ्यासाठी खरी परीक्षा ठरतील असं वाटतं तुम्हाला ? आणि आता तुमचा होकार मिळवण्यासाठी सोपी परीक्षा मलाही नकोय…

रसिका (क्षणभर विचार करत): खरं आहे तुझं म्हणणं. माझ्या निशाच्या कोवळ्या पाठीवर वळ उमटवायला हा बेल्ट पुरेसा आहे. पण तुझ्याकरिता ही शिक्षा कदाचित कमी असेल. (विचार करत) काय करता येईल बरं ? माझ्याकडे तर हाच बेल्ट आहे.

संदीप : मॅम तुमची हरकत नसेल तर माझा बेल्ट वापरता का ? माझा बेल्ट मोठा आहे. तुम्ही मनसोक्त फटके द्या. मी या परीक्षेत यशस्वी होईन याची मला खात्री आहेच. पण दुर्दैवाने जर मी कमी पडलो, अयशस्वी झालो तरी मी हा बेल्ट तुमची आठवण म्हणून आयुष्यभर जपून ठेवेन. पाठीवरचे वळ तर नाहीसे होतील पण बेल्ट तर जपता येईलच.

रसिका : व्हेरी गुड संदीप. तुझे विचार मला अधिकाधिक प्रसन्न करत आहेत. दे तुझा बेल्ट आणि शर्ट काढून परीक्षेसाठी तयार हो.

संदीप : थँक यू मॅम.

(संदीप शर्ट काढतो आणि बेल्ट काढून आदरपुर्वक रसिकाच्या समोर धरतो)

(रसिका बेल्ट हातात घेते आणि संदीपच्या पाठीमागे जावू लागते)

संदीप : मॅम ..एक विनंती करु का ?

रसिका : बोल

संदीप : मॅम तुम्ही माझ्यापाठीमागे उभ्या राहून मला फटके देणार..मी तुम्हाला पाहू शकणार नाही. तुम्ही प्लीज तुमचे सँडल्स काढून इथे ठेवता का ? तुमच्या सॅंडल्सकडे पाहत मला मार खायचं बळ मिळेल.

रसिका (हसत, आश्चर्याने) : काय ?

संदीप : हो मॅम.. तसंही इथे आल्यापासून मी जास्तीत जास्त वेळ मान खाली घालूनच उभा होतो. त्यावेळी तुमच्या पायांकडे आणि तुमच्या सँडल्सकडेच पहात होतो. तुमच्या सँडल्सशी त्यामुळे माझी ओळख झाली आहे आणि त्यांच्याप्रमाणेच माझंही स्थान तुमच्या पायांशी आहे.

रसिका : व्हेरी गुड संदीप. गुड थॉट. खरंच मी खूप प्रसन्न झाले आहे आता. आणि आता तुझं अजून एक बक्षीस. मी तुला आधी छडीने हातावर फटके देईन, जे देताना तू मला बघू शकशील. आणि हा वॉर्म अप झाला की मग मी तुला तुझ्या हातांनी माझे सँडल्स काढायची परवानगी देईन. माझ्या पायांना स्पर्श करुन तुला नक्कीच जास्त बळ मिळेल.

संदीप : थॅक यू मॅम.

(रसिका छडी घेवून येते)

रसिका : कान सोड आता, आणि उजवा हात पुढे कर.

(संदीप हात पुढे करतो, रसिका छडीने फटका लगावते….फटके देत राहते)

रसिका : हं …आता डावा हात पुढे कर

(रसिका पुन्हा अनेक फटके लगावते)

(रसिका सोफ्यात बसते)

रसिका : आता तु माझ्या पायांना स्पर्श करु शकतोस, माझे सँडल्स पायातून उतरवू शकतोस.पण पायांना किस करण्याची परवानगी नाहीये तुला.

संदीप : यस मॅम

(संदीप रसिकाच्या पायातून सँडल्स उतरवतो. तिच्या पावलांवर हळूवारपणे हात फिरवत रहातो )

रसिका : ओके…गेट बॅक टू पोजिशन. या सोफ्याचा आधार घेवून गुडघ्यावर टेकून उभा रहा.

संदीप (रसिकाच्या पायांवरुन हात काढत) : हो मॅम.. (संदीप स्वतःच्या तळहातावर ओठ टेकवतो , आणि मग रसिकाने सांगितल्याप्रमाणे उभा रहातो)

रसिका : तू या परीक्षेत यशस्वी व्हवस असं मला वाटतं पण त्याकरीता परीक्षा मात्र मी सोपी करणार नाहीये हे लक्षात असू दे. चल. ऑल दि बेस्ट.

संदीप : थॅक यू मॅम

(रसिका हवेत बेल्ट फिरवते आणि संदीपच्या पाठीवर जोरदार फटका लगावते. संदीप शहारतो)

(एका मागून एक अनेक फटके पडतात. वीस-पंचवीस फटके झाल्यावर रसिका काहीशी थकते. थांबून पाणी पिते)

रसिका : संदीप , तुला पाणी हवं का ? ही परीक्षा अजून खूप वेळ चालणार आहे. पाणी पिवून घे

संदीप : नाही मॅम. परीक्षेत यशस्वी होवून माझ्या ओठांनी आधी तुमच्या पायांच चुंबन घेईन तेच माझ्याकरिता अमृत असेल.

(रसिका पुन्हा फटके द्यायला चालू करते. पुन्हा अनेक फटके झाल्यावर थांबते)

रसिका (संदीपच्या समोर येत): संदीप , तुझी पाठ पुर्णपणे सोलून निघालीये. या बेल्टने असंख्य वळ तुझ्या पाठीवर उमटवले आहेत. पण माझं मन मात्र अजून भरलेलं नाही. मला अजून खूप फटके द्यायचे आहेत.

संदीप : यस मॅम..

रसिका : पण तुला नक्की खात्री आहे की तू अजून मार झेलू शकतोस ?

संदीप : मॅम..अशा प्रकारे मार खायची माझी पहिलीच वेळ आहे. अर्थातच इतके फटके झेलणे माझ्यासाठी नक्कीच खूप कठीण आहे. पण माझ्या प्रेमाखातर मला हे करायचं आहे. प्रेमाकरिता अग्निदिव्य करायची संधी आयुष्यात पुन्हा पुन्हा मिळत नाही. मला आज मिळाली आहे. त्यामुळे कितीही कठीण असली तरी मला ही परीक्षा पार करायची आहे.

रसिका (हसत) : अरे पण तू असं तर समजत नाहीयेस ना की आज या परीक्षेत तू यशस्वी झालास तर हीच तुझी शेवटची शिक्षा असेल ? तु ही परीक्षा उत्तीर्ण झालास तर आपल्या सहजीवनात कदाचित माझ्यापेक्षा या बेल्टचा तुझ्याशी जास्त संवाद असू शकेल याची कल्पना आहे ना ?

संदीप : होय मॅम.. पण माझ्यावर रागावून , माझ्या चुकांमुळे नाराज होवून तुम्हाला मला शिक्षा करावी लागू नये असाच माझा प्रयत्न असेल.

रसिका (आवाज किंचित चढलेला) : काय म्हणायचय तुला ? तुला मनसोक्त फटके द्यायला माझ्याकडे काही कारण असावं लागेल ?

संदीप : सॉरी मॅम..मला तसं म्हणायचं नव्हतं. माझ्या शरीरावर बेल्ट , छडि , चाबूक वा आणि कशानेही, कधीही आणि कितीही फटके देण्याचा तुमचा अधिकार असेलच. तुम्ही दिलेले वळ हे माझ्याकरिता प्रेमाची भेट असेल. पण माझ्यावर नाराज होवून, रागावून जर तुम्हाला चाबूक हातात घ्यावा लागला तर मात्र मला मी तुम्हाला दुखावलं याचं वाईट वाटेल.

रसिका : हं… ठीक आहे. आता अंगठे धरुन उभा रहा. मी तुझ्या पाठीबरोबरच पायांवरही फटके देईन.

संदीप : यस मॅम.

(रसिका संदीपला बेल्टने फटके द्यायला पुन्हा चालू करते. कधी पाठीवर तर कधी पायावर फटके देते.)

(पुन्हा अनेक फटके झाल्यावर रसिका थांबते, सोफ्यात येवून बसते आणि बेल्ट बाजूला ठेवते. संदीप अजून अंगठे धरुन उभा आहे)

रसिका : संदीप.

संदीप : यस मॅम

रसिका : उठ , उभा रहा.

(संदीप उभा राह्तो)

रसिका : अरे उभ रहायचं म्हणजे गुडघे टेकून उभ रहायचं. आपण एकांतात असताना आणि मी तुझ्याशी बोलत असेन तेव्हा तू नेहमीच गुडघे टेकून आणि मान खाली घालून उभ रहायला हवस.

संदीप : सॉरी मॅम..पुन्हा अशी चूक करणार नाही

(संदीप गुडघे जमिनीला टेकून उभा राहतो)

रसिका : गुड. संदीप तुझी परीक्षा संपली आहे. आणि त्यात तू यशस्वी झाला आहेस. माझ्या आयुष्यात माझा गुलाम म्हणून मी तुला आजपासून स्थान देत आहे. आता तुला माझ्या पायांचं चुंबन घेण्याची अनुमती आहे.

संदीप : थँक यू मॅम… थँक यू..

(संदीप पुढे होवून रसिकाच्या पायांना कवटाळतो. तिच्या पायांना स्पर्श करतो. तिच्या पायांची अनेक चुंबने घेतो. रसिका खाली वाकून त्याच्या पाठीवरुन प्रेमाने हात फिरवते)

(पडदा)
प्रिय वाचक,
कृपया खालीलपैकी योग्य ती प्रश्नावली म्हणजेच सर्वे (survey)उघडून प्रश्नांची उत्तरे द्या.
घन्यवाद.

स्त्री-वाचकांकरिता-प्रश्नावली

पुरुष-वाचकांकरिता-प्रश्नावली

[संपर्क – samarpan.ek.premkatha@gmail.com]

 

the-nice-emotional-girl-with-a-belt-in-hands

Advertisements

4 thoughts on “रसिकाचे स्वयंवर”

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s